कीव / नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनची राजधानी कीव येथे मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला आहे. रात्री राजधानीत रशियाने बाँबहल्ले केले. राजधानी कीवचे मेयर विताली क्लिट्सको यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच भयंकर स्फोट झाले. सध्याची परिस्थिती खूप धोकादायक झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर ही रात्र खूप कठीण असेल, असे युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी म्हटले.
युक्रेनचे विद्यमान अध्यक्ष झेलेन्स्की हे नाझी प्रवृत्तीचे आहेत. त्यांना हटवून युक्रेनियन लष्कराने सत्ता हातात घ्यावी, म्हणजे वाटाघाटी करणे सुलभ होईल, असेही रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. इकडे रशियाने युक्रेनच्या नागरी वस्त्यांवरही जोरदार हल्ले केले. कीव्हच्या उत्तर भागात रशियन रणगाडे दाखल होत असल्याचे एक चित्रणही समोर आले आहे. मध्यरात्रीनंतर एका अपार्टमेंटमध्ये स्फोट झाल्याने शेकडो नागरिक जखमी झाले. कीव्ह शहराला गुडघ्यावर आणण्याचे शत्रूने ठरवून टाकलेले आहे, असे हताश उद्गार कीव्हचे महापौर व्हिटाली क्लिटस्च्को यांनी काढले आहेत.
युक्रेन संपूर्ण व विनाशर्त शरणागती पत्करत नाही तोवर हल्ले सुरूच राहतील, अशी धमकी रशियन परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे. शुक्रवारीही युक्रेनवरील हल्ले सुरूच राहिले. राजधानी कीव्हमध्ये सकाळीच 7 मोठे स्फोट झाले. लोकांनी रात्र सब वे, अंडरग्राऊंड शेल्टरमध्ये जागून काढली. अनेक ठिकाणी लोकांना खायला-प्यायलाही मिळेनासे झाले आहे.
रशियाने युक्रेन वर केलेल्या हल्ल्यानंतर महत्त्वाच्या ठिकाणांसह अनेक विमानतळांवर ताबा मिळवला असून, रशियन सैन्याने युक्रेन ची राजधानी कीवमध्ये दाखल होत कब्जा केल्याचे अधिकृत वृत्त आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांना चर्चेचे निमंत्रण पाठवले. युक्रेनचे आमंत्रण रशियाने स्वीकारले असून, रशिया एक शिष्टमंडळ चर्चेसाठी युक्रेनला पाठविणार आहे.
Russia-Ukraine war continues, night raging in the capital
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कीव ताब्यात घेतल्यानंतर रशियन सैन्याची युक्रेनमधील लष्करी कारवाई सुरूच असून, कोणत्याही क्षणी ते राष्ट्रपती भवनात शिरतील, असा दावा केला जात आहे. अशा स्थितीत युक्रेनने शरणागती पत्करली तर, लाखो नागरिकांचे प्राण वाचू शकतात, असे राजकीय विश्लेषकांच म्हणणे आहे. स्वीडनने रशियाविरोधात युक्रेनला सामरिक मदत करण्याचे जाहीर केले आहे. दोन देशांमधील वाद चर्चेने सोडविला जाण्याची शक्यता दिसू लागली असताना, अन्य देशांनी आक्रमक होणे जागतिक शांततेसाठी धोका असल्याचे बोलले जात आहे.
तत्पूर्वी, कीव्हलगतचे अँटोनोव्ह विमानतळ आता आमच्या ताब्यात आहे, असे शुक्रवारी दुपारीच रशियन फौजांनी जाहीर केले होते. 200 हेलिकॉप्टर्स या तळावर आहेत. सैनिक सज्ज आहेत. कुठल्याही क्षणी ते कीव्हमध्ये उतरतील आणि संपूर्ण शहर त्यांच्या कब्जात असेल. कीव्हमधील पोझ्निअॅक परिसरात झालेल्या रशियन हवाई हल्ल्यात 8 नागरिक जखमी झाले आहेत. हजारो कुटुंबांनी कीव्ह मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतलेला आहे.
अमेरिका आणि नाटोबद्दलच नव्हे तर उर्वरित सार्या जगाबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी, ‘सर्वांनी आम्हाला एकटे पाडले’, असे हताश उद्गार काढले आहेत. रोमानियाच्या जहाजावरील रशियन हल्ला आणि काळ्या समुद्रात उठलेल्या आगीच्या कल्लोळांतून युक्रेनसाठी आशेची पालवी फुटते काय, नाटो सदस्य रोमानियाच्या जहाजावरील रशियन हल्ल्यानंतर तरी नाटो आणि अमेरिकन फौजा युक्रेनच्या बाजूने रणांगणात उतरतात काय, याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे.
□ रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना झटका
युरोपीय संघाने (EU) रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात कठोर निर्णय घेतला आहे. पुतिन आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांना युरोपीय संघाच्या अधिकाऱ्यांनी दणका दिला आहे. या दोघांचीही युरोपातील संपत्ती गोठवण्याच्या निर्णयावर युरोपीय संघ एकमत झाला आहे. यासंबंधीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच पुतिन यांच्यावर प्रवास करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
युक्रेनवर आक्रमण केल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना जागतिक समुदायातील अनेक देशांनी टीकेचे लक्ष्य केले आहे. युरोपीय युनियनने तर पुतिन यांना रोखण्यासाठी त्यांची आणि परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांच्याशी निगडित युरोपातील सर्व संपत्ती गोठविण्याचा आदेश दिला आहे.
दुसरीकडे झेलेन्स्की यांनी पुतीन यांना चर्चेचे निमंत्रण दिल्याचा दावा रशियन सरकारी माध्यमांनी केला आहे. तिकडे बायडेन यांनी पुतीन यांना उद्देशून ‘युद्धखोर’ हे विशेषण वापरले आहे. पुतीन आणि त्यांचा देश युक्रेनवरील हल्ल्याचे दूरगामी परिणाम भोगतील, असा शापही दिला आहे.