मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी गरवारे कॉलेज ते आनंदनगर कोथरूड या दरम्यानच्या मेट्रोचे उदघाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी तिकीट काढून मुलांसोबत मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास केला. यावरून काँग्रेसने टीका केली. ‘रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात?’, काँग्रेसने म्हटलं. असं महाराष्ट्र काँग्रेसने म्हटले.
मोदींनी या मेट्रो प्रवासात काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. ज्यांनी शाळेचा गणवेश परिधान केला आहे. मात्र, आज रविवार असतानाही ही मुले शाळेला का जात आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात असून टीकाही केली जात आहे.
मोदींच्या मेट्रो रेल्वे प्रवासात त्यांच्या सोबत असलेली मुले शालेय गणवेशात असल्याने अनेकांनी रविवारीही शाळा सुरु असते का असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावरुन आता पंतप्रधान मोदींवर टीकाही होत आहे. रविवार असल्याने विद्यार्थी शाळेच्या गणवेशात कसे असा सवाल करत काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे. तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.
यावेळी पंतप्रधानांनी स्वतः तिकीट काढून गरवारे मेट्रो स्टेशन ते आनंदनगर मेट्रो स्टेशन प्रवास केला. तसेच मेट्रोमध्ये त्यांनी पुण्यातील काही विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. यावेळी गरवारे मेट्रो स्टेशनवर पंतप्रधान मोदींसह राज्यपाल कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते. ‘Sunday is a school holiday, why bother kids for publicity’
रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं)
तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात?#महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा pic.twitter.com/sksMUI3yOB— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 6, 2022
महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटलंय की, रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदीसाहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास देत आहात? #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा असा हॅशटॅगही जोडण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट..
पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. मात्र मोदींच्या या दौऱ्याला काँग्रेस, राष्ट्रवादीकडून तीव्र विरोध करण्यात आला. पुणे शहर काँग्रेसच्यावतीने शहरात ठिकठिकाणी गो बॅक मोदी असा मजकूर असलेले काळे फलक लावण्यात आले होते.
□ महाराष्ट्रद्रोही मोदी माघारी जा; काँग्रेसकडून विरोध
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्यासाठी पुण्यात आगमन झालं. पण मोदींच्या पुणे दौऱ्याचा विरोध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुण्यात अलका चौकात आंदोलन केलं आहे. या आंदोलनात महाराष्ट्राचे महत्त्व कमी व्हावे याकरिता सातत्याने मोदी सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या आंदोलनात महाराष्ट्रद्रोही मोदी माघारी जा अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.
● छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते उद्घाटन
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळ येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले. मोदी यांनी पुणे महापालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे उद्घाटन केले.
पंतप्रधान गरवारे स्टेशनकडे रवाना झालेत. विमानतळावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ले.ज.जय सिंह नैन, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते. त्यानंतर मोदी हे पुणे महापालिकेच्या दिशेने रवाना झाले.
पंतप्रधानांनी आधी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. मोदींच्या समवेत यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावरणानंतर पंतप्रधान मोदींचा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, पंतप्रधानांसाठी बनवलेला खास फेटा आणि उपकरणे भेट देऊन विशेष सत्कार केला. या नंतर पंतप्रधानांनी तिथे उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने भाजपाचे नगरसेवक होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे दोघेही त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री महत्त्वाच्या कार्यक्रमांना आणि बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत. सध्या मुख्यमंत्र्यांना प्रवास करणं शक्य होत नसल्यामुळे ते पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या पुण्यातील कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.