पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. याआधी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. पोलिसांनी यावेळी लाठीचार्ज केला. यावेळी फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा तिथं आला असता एका अज्ञात व्यक्तीनं या गोंधळात फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली.
कार्यक्रमाआधीच भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी तणाव निर्माण झाल्यानंतरे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला होता.
याआधी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकमेकांसमोर आल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवण्याची घटना घडली. उद्यान उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता. याचदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. Slippers thrown at Devendra Fadnavis’ car in Pune, mild caning of NCP workers
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या दरम्यान जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा ताफा दाखल झाला त्या गोंधळात एका अज्ञात व्यक्तीनं चप्पल फेकली. भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला होता.
गेल्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. ते यासंबंधी निवेदन देवेंद्र फडणवीस यांना देणार होते. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि वादाला सुरुवात झाली.
काँग्रेसने सकाळी पंतप्रधानांचा विरोध केला होता. काँग्रेसचे कैलास कदम म्हणाले, ‘निव्वळ श्रेय लाटून, प्रसिध्दी मिळविण्यासाठी आणि काम अर्धवट असतानाही पंतप्रधानांच्या हस्ते भाजप त्याचे उद्घाटन करीत आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा संसदेमध्ये अवमान केला आहे. शेतकरी आणि कामगारांचा अवमान केला आहे. अशा पंतप्रधानांचा तीव्र निषेध शहर कॉंग्रेसच्या वतीने करीत आहोत.”
माजी नगरसेवक मारुती भापकर म्हणाले, ”ना खाऊंगा ना खाने दुंगा’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेले मोदी आणि भय व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत आश्वासन दिले होते. परंतु अगदी त्यांच्याविरुद्ध भाजप आणि त्यांचे पदाधिकारी वागत आहेत. अन्याय, अत्याचार सुरू असल्याचे म्हटले.