सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एका 30 वर्षीय महिलेला गर्भनिरोधक (कॉपर टी ) चूकीच्या पध्दतीनं बसवल्यामुळे अतिरक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काहीदिवसांपूर्वी एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या महिलेला कॉपर टी हे गर्भनिरोधक गर्भाशयात बसवण्यात आलं होतं. पण अतिरक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर महिलेला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तिचा मृत्यू झाला. एका स्थानिक राजकीय व्यक्तीने मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण शांत झाले आहे. या प्रकरणात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मृत महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी गेली होती. यावेळी तिला एका प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भनिरोधक (कॉपर टी) बसवण्यात आला होता. पण यानंतर तिच्या पोटात वेदना होऊ लागल्या होत्या. दरम्यान रक्तस्त्रावही सुरू झाला. Incorrect bleeding due to improper contraception; Death of a woman
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रक्तस्त्राव थांबत नसल्यानं तिला तातडीनं उपचारासाठी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.डॉक्टरांकडून उपचार सुरू असताना देखील तिचा रक्तस्त्राव थांबत नव्हता. अशात रक्तस्त्राव न थांबल्यानं शनिवारी तिचा मृत्यू झाला.
ही घटना उघडकीस येताच मृत महिलेच्या सासरच्या मंडळींनी सिव्हिल रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पण काही राजकीय पदाधिकार्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
● कॉपर टी काय असते
‘कॉपर टी’ हे प्लॅस्टिक आणि तांब्यापासून बनवलेलं एक लहान इंट्रायूटरिन उपकरण असतं. जे स्त्रीच्या गर्भाशयात बसवलं जातं. याचा आकार ‘टी’ अक्षराप्रमाणे असून तो गर्भाशयात सहजपणे बसतो. शुक्राणूंना मारण्याचे काम करतात. आणि शुक्राणूंशिवाय गर्भधारणा अशक्य आहे. त्यामुळे कॉपर-टी 99 टक्के प्रभावी असल्याचे मानले जाते. कॉपर-टी 10 ते 12 वर्षे काम करू शकते.
कॉपर टी हे उपकरण स्त्रीच्या गर्भाशयात तयार झालेल्या अंड्याला पुरुषाच्या शुक्राणूंद्वारे फलित होऊ देत नाही. त्यामुळे गरोदर राहण्यापासून रोखण्यास मदत होते. त्यामुळे हे उपकरण वापरले जाते.