सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील एका ७५ वर्षांच्या वृध्द महिलेवर दुष्कर्म करुन तिची हत्या करणाऱ्या मल्लप्पा बसवंत बनसोडे (वय ४८, रा. उडगी, ता. इंडी, जि. विजयपूर) याला खूनप्रकरणी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड तर दुष्कर्मप्रकरणी १५ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी मंगळवारी ठोठावली.
आरोपीने वृध्देवर दुष्कर्म करुन क्रूरपणे हत्या केल्याने हा खटला दुर्मिळातील दुर्मीळ असल्याने आरोपीस फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी सरकार पक्षाने मंगळवारी न्यायालयात केली. याबाबत उच्च न्यायालय व सर्वोच्च – न्यायालयातील निवाडे सादर करण्यात आले. परंतु न्यायालयाने त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
१९ जानेवारी २०१९ रोजी वृध्द स्त्री आणि तिचा पती अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील डीसीसी बँकेत आले होते. पती पैसे घेऊन घराकडे गेले तर वृध्द महिला पैसे मिळण्यास उशीर झाल्याने बँकेतच थांबली होती. बँकेतून पैसे घेऊन बाहेर पडल्यानंतर आरोपी मल्लप्पा याने त्यांना गाठले. दुचाकीवरून गावाकडे सोडतो असे सांगून महिलेला दुचाकीवर बसवून नेले.
आरोपीने महिलेकडे दारुसाठी दीड हजार रुपये मागितले. परंतु महिलेने नकार दिला. त्याच्या मनात राग होता, यामुळे त्याने दुचाकी वाटेतील कडबगाव शिवारातील शेतात उभी केली. त्यानंतर मल्लप्पाने महिलेवर दुष्कर्म करुन तिचा निर्घृण खून केला. रक्ताने माखलेले कपडे घेऊन तो तसाच घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेची पोलिसात अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली. परंतु तपासादरम्यान आणि महिला आणि आरोपीला पाहिलेल्या मल्लिनाथ करपे यांनी दिलेल्या माहितीवरून आरोपीस दुधनी बसथांबा येथून ताब्यात घेतले होते. यानंतर केलेल्या चौकशीतून आरोपीने गुन्हा कबूल केला. या खटल्यात सरकारतर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अहवाल, साक्षीदाराची साक्ष, रक्ताने माखलेले कपडे यावरून आरोपीनेच वृध्देचा दुष्कर्म करुन खून केल्याचे सिध्द होते, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला. Man sentenced to life in prison for murdering old woman
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मल्लप्पा यास दोषी धरले होते. मंगळवारी न्यायालयाने त्यास खूनप्रकरणी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड तर दुष्कर्मप्रकरणी १५ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत तर आरोपीतर्फे ॲड. ए. डी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
□ सोलापुरात लाचखोर एपीआयस ठोकल्या बेड्या, सुनावली पोलीस कोठडी
सोलापूर : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक लाखाची लाच मागून ५० हजार रुपये स्वीकारताना सोलापूर शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षकास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
सोलापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये तक्रारदाराच्या इतर नातेवाईकांना आरोपी न करण्यासाठी ५० हजाराची लाच मागितल्याप्रकरणी जोडभावीपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिनेश श्रीकांत कुलकर्णी (वय ३२ रा. जांदगाव ता. तुळजापूर) यास लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने अटक केली.
यातील आरोपी लोकसेवक यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने मंगळवारी दिला. या प्रकारामुळे शहर पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.
जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात जानेवारी अखेर एक तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्यांमध्ये तक्रारदाराची पत्नी, सासू, मेहुणा, मेहुणी आणि तिचा नवरा हे देखील आरोपी होतात. जर त्यांना आरोपी करायचे नसेल तर लाख रुपयाची लाच सहाय्यक निरीक्षक कुलकर्णी याने तक्रार दाराकडे केली होती. तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात संपर्क साधून तक्रार नोंदवली होती.
लाचलुचपतच्या पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून पोलीस अधिकारी कुलकर्णी याला जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दिनेश कुलकर्णी आला १० मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
ही कारवाई लाचलुचपतचे उपअयोक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाठिक, पोलीस नाईक कोष्टी, पवार, सण्णके आणि सुरवसे आदांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महाडिक हे करीत आहेत.
□ पाइपने मारहाणप्रकरणी एक वर्षाची सक्तमजुरी
सोलापूर – पाइपने मारहाण करुन जबर दुखापत केल्याप्रकरणी उत्तम नागनाथ यमपुरे (रा. न्यू पाच्छा पेठ) यास एक वर्षाची सक्तमजुरी व द्रव्यदंडाची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. आय. भंडारी यांनी ठोठावली.
करुन दोषारोपपत्र सादर केले होते. सरकार पक्षातर्फे यामध्ये एकूण चार याबाबत मुनाफ नदाफ (वय साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात ३५, रा. शुक्रवार पेठ) यांनी सदर आल्या होत्या.
सदर साक्षी, पुरावा बझार पोलीस ठाण्यात फिर्याद ग्राह्य मानून मुख्य न्यायदंडाधिकारी दिली होती. आरोपीने पाइप भंडारी यांनी आरोपीस एक वर्षाच्या कापण्याचे मशीन का दिले नाही सश्रम कारावासाची व द्रव्यदंडाची म्हणून फिर्यादीस पाइपने मारहाण शिक्षा ठोठावली. यात सरकारतर्फे करुन जबर दुखापत केली होती. अॅड. अमर डोके व आरोपीतर्फे या खटल्यामध्ये पोलीस अंमलदार ॲड. ए. एन. शेख यांनी काम एस. एम. बागवान यांनी तपास पाहिले.