● काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूंचाही पराभव
चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांचा भदौर आणि चमकौर साहिब या दोन्ही मतदारसंघातून पराभव झाला. पंजाबमध्ये ‘आप’ने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आता येथे ‘आप’ सरकार स्थापन करणार आहे. त्यातच चरणजित सिंह उद्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. उद्या मंत्रीमंडळाची बैठक घेऊन ते आपल्या पदाचा राजीनामा देतील.
सुरुवातीच्या कलांनुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत असून या निवडणुकीत आम आदमी पक्षाने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच सध्याच्या आकडेवारीनुसार ११७ जागांपैकी तब्बल ८९ जागांवर आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस १२, अकाली दल १० जागांवर, भाजप ९ तर अपक्ष एका जागेवर आघाडीवर आहे.
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा झटका बसला असल्याचे दिसत आहे. तर आम आदमी पक्षाने मुसंडी मारत इतरांना क्लीन स्विप दिल्याचं बोलले जात आहे. पंजाबमध्ये मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेसने पराभव स्वीकारला असून मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवणार आहेत. मुख्यमंत्री आपल्या सरकारी निवासस्थानी पोहोचले आहेत. Punjab: The Chief Minister will resign tomorrow, defeating Channi in both the seats
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये दिग्गजांना पराभवाचं तोंड पाहावं लागलंय. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री चरणजीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी रुपनगर आणि बरनाला दोन जागी निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू याचा देखील पराभव झाला. तर, शिरोमणी अकाली दलाचे पंजाबच्या सुखबीर सिंह बादल यांचा तेरा हजार मतांनी पराभव झाला आहे. तर, प्रकाश बादल यांचा देखील पराभव झाला आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती, मात्र अंतर्गत कलहामुळे काँग्रेसच्या हातून जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती. निवडणुकीचा प्रचार सुरू होण्याच्या आधीपासूनच अशी चर्चा केली जात होती. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू यांच्यात कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. या दोघांमधील संघर्षाचा त्यांच्या पक्षाप्रमाणेच त्यांनाही वैयक्तिकरित्या फटका बसला आहे.
शेतकरी आंदोलनामुळे देशाचे लक्ष लागलेल्या पंजाबमध्ये भाजपचा सफाया होणार असं एक्झिट पोलच्या भाकितामध्ये सांगण्यात आलं होतं. पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता राखणे कठीण असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ बहुमताने सत्तेवर येईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला होता. विधानसभेच्या ११७ जागा असलेल्या पंजाबमध्ये बहुमतासाठी ५९ ची संख्या आवश्यक आहे. ११७ जागापैंकी ९१ जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत.