चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर आम आदमी पार्टीच्या रडारवर इतर राज्ये आली आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेशची सत्ता मिळवण्यासाठी आहे. आपचे नेते म्हणाले की, ‘होय, आम्ही गुजरात आणि हिमाचल प्रदेशात नक्कीच जाणार आहोत. ही दोन राज्ये आमच्या रडारवर असून पक्ष कार्यकर्त्यांना या राज्यांमध्ये पाठवत आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांनी एक विधान केलं आहे. आपच्या झाडूने 70 वर्षांची घाण साफ करेल. तसेच सर्व सरकारी कार्यालयात शहीद भगतसिंग आणि भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्यात येईल, असं एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत भगवंत मान म्हणाले.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. ‘आप’ला येथे 88 जागांवर आघाडी मिळाली. त्यामुळे ते या ठिकाणी सरकार स्थापन करणार, असे जवळपास निश्चित आहे. त्यानंतर ‘आप’चे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी आमचा पक्ष काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर पर्याय आहे, असे म्हटले आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आत आम आदमी पक्षाचं लक्ष्य राष्ट्रीय राजकारण असेल असे स्पष्ट केले. दिल्लीतून सुरू झालेला इन्कलाब हा आता पंजाबमध्ये पोहोचला आहे. आता हा इन्कलाब देशभरात पोहोचेल, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी सर्वांना आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे.
After Punjab, now ‘these’ states on your radar, Arvind Kejriwal will be the Prime Minister
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंजाबच्या लोकांनी कमाल केली. लव्ह यू पंजाब. आज पंजाबमध्ये जे निकाल लागले आहेत. तो एक मोठा इन्कलाब आहे. आज पंजाबमध्ये मोठमोठ्या खुर्च्या हलल्या आहेत. बादल, कॅप्टन, चन्नी, सिद्धू असे दिग्गज पराभूत झाले आहेत. ही मोठी क्रांती आहे. आज जे कुणी माझं भाषण ऐकत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, सध्याची परिस्थिती पाहून तुम्हालाही वाईट वाटत असेल. नेते पक्ष देशाला ज्याप्रकार लुटत आहेत ते पाहून तुम्हालाही राग येत असेल. तुम्हालाही काहीतरी करायचं आहे. आता ती वेळ आली. आधी दिल्लीत इन्कलाब झाला, आता पंजाबमध्ये इन्कलाब झाला.
शेतकरी आंदोलन सुरु असताना दिल्तील आपने ज्या सुविधा दिल्या त्यामुळे लोकांनी आपला पसंती दिली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. तसेच आपचे शरद पवार यांनी कौतुक केलं आहे. आपचे विचार पंजाबच्या लोकांना पटले आहेत. तसेच दिल्लीत ज्या प्रकारे सामान्य नागरिकांचे प्रश्न आपने जाणून घेऊन सोडवले आहेत. त्यामुळे पंजाबवासियांनी आपला मत दिलं आहे. असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस कुठे कमी पडली हा त्यांचा प्रश्न असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.
काँग्रेसची परिस्थिती पंजाबमध्ये चांगली होती. परंतु त्यांच्यामध्ये काही निर्णय घेतले त्याला पंजाबच्या जनतेनं स्वीकारले आहे. अमरिंदरच्या नेतृत्वात सरकार होते. नंतर नवीन नेतृत्व आणले परंतु हा निर्णय लोकांना आवडला असे दिसत नव्हते. असा निर्णय घेतला नंतर कॅप्टन अमरिंदर यांनी वेगळी पार्टी तयार करुन भाजपला समर्थन दिलं. हे सुद्धा लोकांना आवडले नाही. पंजाबची स्थिती अलग होती, यामुळे सांगतो की, दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात सगळ्यात मोठा हिस्सा पंजाब, हरियाणाचा होता. पंजाबच्या लोकांच्या मनात जो राग होता तो या निवडणुकीमध्ये दिसला आहे. यामुळे लोकांनी भाजपला आणि काँग्रेसला हरवलं आणि नवीन पक्षाला पाठिंबा देत सत्ता आपच्या हातामध्ये दिली असल्याचे शरद पवार म्हणाले.
□ भगवंत मान ! कॉमेडियन ते मुख्यमंत्री
पंजाबमध्ये आम आदमी पक्षांची सत्ता येणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तसेच ‘आप’ ने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून भगवंत मान यांच्या नावाची आधीच घोषणा केली आहे. त्यामुळे मान हे पंजाबचे मुख्यमंत्री होणार आहेत. राजकारणात येण्याआधी मान हे प्रसिद्ध विनोदी अभिनेते होते. त्यांनी कपिल शर्मासोबत अनेक विनोदी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. मान यांनी पंजाब पिपल्स पार्टीतून राजकारणाची सुरुवात केली होती.