मोहोळ : कोळेगावच्या सरपंचाचे लेटर पॅडवर बनावट सही शिक्के वापरून स्वतःच्या फायद्यासाठी उच्च न्यायालया रस्त्याच्या कामासाठी पुरावा म्हणून दिल्याने दोघावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतळाबाई भाऊराव शिंदे या मोहोळ तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथील रहिवासी असून त्या कोळेगावच्या विद्यमान सरपंच आहेत. १७ जानेवारी २०२२ रोजी रेल्वे स्टेशन येथीलच रहिवासी सतीश गोरख पाटील हा महिला सरपंच शिंदे यांच्याकडे गेले व भावाच्या पत्नीला घरकुलासाठी तुमचे लेटरपॅड आवश्यक आहे, असे म्हणून सरपंचांचे लेटर पॅड मागितले.
त्यावेळी सरपंच शिंदे यांच्या पतीने त्यांना ग्रामपंचायत कोळेगावचे कोरे लेटर पॅड दिले. त्यावर मजकुर लिहुन आणल्यानंतर पाहून सही देतो, असे सांगितले. त्यानंतर सतीश पाटील हा लेटर पॅड घेवून गेला तो परत आलाच नाही. त्यानंतर दि. ९ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वा. दरम्यान रेल्वे स्टेशन येथीलच बाळासाहेब देशमुख हे सरपंच शिंदे यांच्याकडे आले.
देशमुख यांनी सांगितले की, त्यांची बहीण चेतना देशमुख आणि हणमंत पाटील यांचेमध्ये रस्त्याच्या संदर्भात वाद चालू आहे. त्यांची बहीण चेतना देशमुख यांना रस्त्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस आली आहे. त्यामधील कागदपत्रात ग्रामपंचायत कोळेगांवचे लेटरपॅड आहे. Abuse of letterpad of female sarpanch in Mohol, case filed
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सदरचे लेटर पॅड सरपंच शिंदे यांनी पाहीले असता त्यामध्ये हणमंत वाल्मिक पाटील, व इतर शेतकरी, (रा.मोहोळ रेल्वे स्टेशन, पुर्नवसन गावठाण) येथील रहिवाशी असून, त्यांची जमीन गट क्रमांक ५९९ हा रेल्वे ब्रिजच्या पूर्व बाजूस असून, रेल्वे पश्चिम बाजूस आहे. सदरील गट क्र. ५९९ पूर्व बाजूस आहे. सदर गटास जाणे – येण्यासाठी धरणग्रस्त शेतकऱ्यास व इतर शेतकऱ्यास रेल्वे ब्रिज खालून ५० वर्षापासून पारंपारिक रस्ता आहे. येथील शेतकरी आजअखेर, रेल्वे ब्रीज खालून शेती माल वाहतूक करीत आहेत. अशा प्रकारचा मजकुर लिहिलेला होता.
सदरील लेटर पॅडवरील गोल शिक्का, सरपंचाचा शिक्का, तारीख आणि त्यांची सही हे सर्व खोटे असल्याचे लक्षात आहे. शिवाय लेटर पॅडवर जावक क्रमांक टाकलेला नव्हता. त्यामुळे सतीश गोरख पाटील याने आम्हाला खोटे बोलून लेटरपॅड घेतले. सतीश पाटील आणि हणमंत वाल्मिक पाटील (रा.तुंगत, ता.पंढरपूर ) यांनी आम्ही दिलेल्या लेटर पॅडवर बनावट शिक्के वापरुन त्यावर खोटी सही करुन स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला.
न्यायालयात पुरावा म्हणून दाखल केले आहे. त्यामुळे महिला सरपंच पुतळाबाई शिंदे यांनी सतीश गोरख पाटील व हणमंत वाल्मिक पाटील या दोघांच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात बनावटीकरण व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे करीत आहेत.