● प्रस्थापितांसाठी नव्हे, तर उपेक्षितांसाठी जगलो!
सोलापूर : सध्या सर्वत्र गाजत असलेल्या झुंड चित्रपटाची हवा आहे. हा चित्रपट विजय बारसे यांच्यावर सत्य घटनेवर आधारित आहे. त्यांचा आज सोलापुरात गौरव झाला. विजय बारसे हे मूळचे भंडारा जिल्ह्यातले. शिक्षणासाठी नागपूर शहरात क्रिडाशिक्षक म्हणून कार्य केले. तिथेच सत्य घटना घडली. त्यावर आधारित झुंड चित्रपट साकारला गेला .
डीवायएफआय सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने आज बुधवारी (दि. १६) दत्त नगर येथील कार्यालयात हा गौरव सोहळा झाला. यावेळेस विजय बारसे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या हस्ते सन्मानपत्र, सोलापुरी चादर, शाल, बुके देऊन गौरव करण्यात आला.
समाजामध्ये अवैध गुन्हेगारी आणि व्यसनाधीन तरूणाईवर बोट दाखविणारे अनेक लोक आहेत. तसेच आहे रे वर्गातील मुलांना जगण्यासाठी सर्व साधने उपलब्ध होतात. परंतु नाही रे वर्गातील मुले परिस्थिती अभावी शिक्षण व खरे जीवन जगण्यापासून वंचित राहतात. या प्रस्थापित व्यवस्थेतील लोक शोषित पिडीताना आपलेसे करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून मी माझे परिवार गुन्हेगारी पार्श्वभूमी व व्यसनाधीनतेच्या जाळ्यात गुरफटलेले तरुण-तरुणींना शिक्षण व स्लम सॉकरच्या माध्यमातून फुटबॉल खेळाची आवड निर्माण करून मैदानात उतरविले. त्यांना व्यसनापासून परावृत्त केले. अर्थातच प्रस्थापितांपेक्षा उपेक्षितांसाठी जगण्यात खरा अर्थ आहे. हा माझा संदेश झुंड चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या पुढे आलेला आहे. यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य समर्पित केल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांनी व्यक्त केले. Glory to Vijay Barse for the storyline of the film ‘Zhund’ in Solapur
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावेळी बोलताना आडममास्तर म्हणाले कि, मी सुद्धा झोपडपट्टीत राहणाऱ्या श्रमिकाला त्याचे न्याय हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी तब्बल ५ दशके लढाई लढत आहे. आणि आपण या झोपडपट्टीतील मुले निर्व्यसनी होऊन क्रीडापटू बनावे यासाठी प्रयत्नशील आहात. अर्थातच आपले माध्यम जरी वेगळे असले तरी आशय एकच आहे. मला देशाचे भवितव्य असणारे या तरुणाच्या मनगटातील ताकदीवर विश्वास आहे. परिवर्तन असो वा क्रांती हे तरुणच करू शकतील, असा आशावाद व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, सिटूचे राज्य महासचिव कॉ.एम.एच.शेख, रे नगर फेडरेशन चेअरमन नलिनीताई कलबुर्गी, सचिव युसुफ शेख (मेजर), माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदा बल्ला, युवा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ उपस्थित होते.
यावेळी दिल्ली येथे झालेल्या आठव्या राष्ट्रीय विद्यार्थी ऑलम्पिक स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते श्रेया शिंदे, ओसामा आवटे, वरद हक्के, प्रशिक्षक अक्सर शाबाद, संदेश बोर्डे, अमित शिंदे, कुंदन कसबे आदींचा आडम मास्तर व मान्यवरांचा हस्ते प्रशस्तीपत्र, शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्ता चव्हाण यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कादर शेख, वसीम मुल्ला, बजरंग गायकवाड, नरेश गुल्लापल्ली, नितीन माकम, कुमार यलगेटी, सुनील आमाटी, जैद मुल्ला, अकील शेख हसन शेख, शाम आडम, अमोल काशिद, राजन काशिद, शेखर क्षीरसागर, शशिकांत गुंडाला, अप्पाशा चांगले, प्रवीण आडम, बालाजी गुंडे आदींनी परिश्रम घेतले.