● बार्शीत शिक्षकाची दोन लाखाची फसवणूक
बार्शी : पती – पत्नीचा संसार हा भांडणाशिवाय होऊच शकत नाही. छोटे – मोठे खटके उडतात. त्यातून लाडिक रागही येऊ शकतो. पण कोणी आपलं स्वतःच राहते घर पेटवून देत का, होय सोलापुरात बायकोबरोबर भांडण झाल्याने पतीने थेट घराला आग आग लावून टाकली.
बायकोबरोबर भांडण झाल्याने नवरोजीने घरातील सामान पेटविल्यामुळे सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बार्शी शहरामध्ये घडली आहे. याबाबत ज्योती सचिन नाईकवाडी (रा. नविन रेल्वे स्टेशन बार्शी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नवरा सचिन प्रदीप नाईकवाडी याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सचिन नाईकवाडी हा रिक्षा चालक असून त्यास दारु पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे नवरा – बायकोत दररोज भांडण होते. त्या मजुरी काम करुन संध्याकाळी 6.30 वा. घरी आल्या तेंव्हा सचिनने स्वयंपाक का करत नाही. स्वयंपाक नाही केला तर घर जाळून टाकीन असे म्हणून शिविगाळ करुन मारहाण केली.
त्यामुळे त्या घरातून बाहेर पळून गेल्या. थोड्या वेळानंतर त्या शेजारी राहणा-या मिनाक्षी केंगार यांच्या घरी गेल्या असता त्यांनी सचिनने घरातील कपडे गोळा करुन लाईटचे शेगडीवर टाकून शेगडी चालू करुन घरातून बाहेर निघून गेला.
सचिन मारहाण करेल या भीतीने त्या घरी न जाता थेट पोलिस ठाण्यात गेल्या. व पोलिसांना घेवून घरी गेल्या असता घरातील वापरती कपडे, धान्य, टिव्ही, सोफासेट व संसार उपयोगी वस्तु जळून अंदाजे 30,000/- हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचे आढळून आले. Solapur: Husband set fire to house due to quarrel with wife
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
● बंद करण्यास गेलेल्या क्रेडिट कार्ड वरुन दोन लाख रुपयांची फसवणूक
बार्शी : जे पाहिजे होते ते क्रेडिट कार्ड न येता दुसरेच आल्याने बंद करण्यास गेलेल्या क्रेडिट कार्डवरुन दोन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना बार्शीत घडली आहे.
याबाबत फसवणूकग्रस्त शिक्षक महादेव विठ्ठल मिरगणे (रा. म्हाडा कॉलनी, नवीन पाण्याचे टाकीसमोर, गाडेगांव रोड बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महादेव मिरगणे यांना स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील अभिजित सुनिल पलंगे याने फोन करुन क्रेडिट कार्ड घेण्यास सूचविले होते. त्यानुसार बँकेत जावून त्यांनी 1700/- रुपये वार्षिक फी असलेल्या एस.बी.आय. पल्स कार्ड साठी फॉर्म भरुन दिला. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी त्यांना क्रेडिट कार्ड मिळाले. त्यामुळे ते कार्यरत करण्यासाठी ते बँकेत गेले. त्यावेळी अभिजीत पलंगे यांनी त्यांनी मागितलेल्या क्रेडिट कार्ड ऐवजी 5000 रु. वार्षिक फी असलेले दुसरे क्रेडिट कार्ड आले असल्याचे सांगितले.
त्यांना जास्त फी चे कार्ड नको असल्यामुळे त्यांनी ते ब्लॉक करुन पल्स कार्डच मिळावे, असे पलंगे यांना सांगितले. त्यावेळी पलंगे यांनी कार्ड ब्लॉक करण्याची प्रक्रिया करुन 48 तासात ते ब्लॉक होईल, त्यासाठी क्रेडिट कार्ड विभागाकडून व्हेरीफिकेशन कॉल आल्यावर आवश्यक माहिती द्या, असे सांगितले. त्यानुसार त्यांना आलेल्या कॉलवर त्यांनी पूर्ण माहिती सांगून कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले. यावेळी त्यांनी विचारलेला ओटीपीही त्यांनी सांगितला. त्यानंतर थोड्या वेळातच त्यांच्या मोबाईलवरुन एकूण 1,98,208/- ऐवढी रक्कम कट झालेबाबत त्यांना मोबाइलवर मेसेज आल्याचे फिर्यादीत म्हटले.