● विठूरायाच्या पायावर माथा टेकवून घेता येणार दर्शन
सोलापूर / पंढरपूर : पंढरपूर भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. भाविकांना आता विठ्ठल रुक्मिणीच्या पायाचे दर्शन करता येणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून पदस्पर्श दर्शन बंद होते. सावळ्या विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची आस पूर्ण होणार असल्याने विठ्ठल भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.
वारकऱ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या पायाशी माथा टेकून दर्शन घेता यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली होती. त्या प्रस्तानावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी दिली आहे अशी माहिती समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर (दि २) सुरू होणार आहे. याशिवाय विठ्ठलाची चंदन पूजा, पाद्य पूजा देखील सुरू होणार आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पदस्पर्शाने सुरू करण्याची मागणी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी व भाविक भक्तांकडून होत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थिती विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन बंद आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शनाची सोय विठ्ठल मंदिर समितीकडून करण्यात आली आहे. त्यासंबंधित विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सदस्यांकडून विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन सुरू व्हावी, अशी मागणी करण्यात आली. From Gudipadva, devotees will get Padasparsha Darshan of Mother Vitthal Rukmini
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्या संदर्भात राज्य शासनाकडे मागणी करण्यात आला होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून विठुरायाचे दर्शन घेता न आलेल्या भाविकांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठूरायाच्या पायावर माथा टेकून दर्शन करता येणार आहे. या मागणीसाठी वारकरी शिक्षण संस्थेमधील बाल वारकर्यांसह विविध वारकरी प्रतिनिधी यांच्या वतीने संत नामदेव पायरी येथे भजन आंदोलन करण्यात आले होते.
कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर १७ मार्च २०२० रोजी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळी पाडव्याला सुरू झाले. दुसऱ्या लाटेत १२ एप्रिल रोजी मंदिर पुन्हा बंद झाले. त्यानंतर नुकतेच कार्तिकी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले. मात्र कोरोनामुळे सरकारने अनेक नियम लागू केले होते. तसेच श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू होते. मात्र पदस्पर्श दर्शन अद्याप बंद आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने श्री विठ्ठलाचे हे पदस्पर्श दर्शन सुरू करा, अशी मागणी वारकरी, भाविकांकडून होत होती.
अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विकासाच्या आराखड्यास ७३ कोटी ८० लाख रु. निधी मंजूर झाल्याचा समाधान व्यक्त करण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुलवड आदींनी सदिच्छा भेट घेतली.