मुंबई : TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश दिला आहे. कंपन्यांना कमीत-कमी एक रिचार्ज प्लॅन असा ठेवावा लागेल ज्याची व्हॅलिडिटी संपूर्ण महिना असेल. म्हणजे सध्याचे रिचार्ज प्लॅन हे 28 दिवस, 24 दिवस असे आहेत. ते 28 दिवस न ठेवता संपूर्ण 30 किंवा 31 दिवस ठेवावेत असे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी टेलिकॉम कंपन्यांना 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, काही कंपन्यांनी असा प्लॅन सुरू केलाय.
म्हणजेच आता सध्याचे रिचार्ज प्लॅन हे 28 दिवस, 24 दिवस असे आहेत. ते 28 दिवस न ठेवता संपूर्ण 30 किंवा 31 दिवस ठेवावेत असे आदेश देण्यात आले आहेत. टेलिकॉम कंपन्यांना यासाठी 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. TRAI ने टेलिकॉम कंपन्यांनी (Telecom Companies) कमीत-कमी एक प्लॅन, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक स्पेशल रिचार्ज प्लॅन संपूर्ण महिन्याभराच्या वॅलिडिटीसह असावा.
जर 31 तारीख पुढील महिन्यात येत नसेल तर पुढील महिन्याची शेवटच्या तारीखेला रिचार्ज करावा लागेल. कंपन्यांना या बदलांसाठी 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून 1 जून 2022 पासून संपूर्ण एका महिन्याचा रिचार्ज प्लॅन आवश्यक असणार आहे. अनेक टेलिकॉम कंपन्या एका महिन्याच्या रिचार्जच्या नावाने केवळ 28 दिवस चालणारा रिचार्ज देतात. याबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत होत्या.
काही दिवसांपूर्वीच ट्रायच्या आदेशानंतर जिओने एक महिन्याची वैधता असलेला प्लॅन आणले केला होता. त्यानंतर आता Airtel ने देखील दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत.
Great news for mobile customers; Mobile recharge will be for 30 days
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
ज्यांची वैधता एक महिन्याची आहे. एका महिन्याच्या वैधतेसह एअरटेलच्या दोन्ही नवीन प्लॅनच्या किंमती अनुक्रमे 296 रुपये आणि 319 रुपये आहेत. यापैकी 296 रुपयांच्या प्लॅनची वैधता 30 दिवसांची असून 319 रुपयांच्या प्लॅनची वैधता संपूर्ण महिन्यासाठी आहे म्हणजेच तुम्ही ज्या तारखेला रिचार्ज कराल, त्याच तारखेला पुढील महिन्यात रिचार्ज करावे लागणार आहे. स्वतः. काही महिन्यांपूर्वी ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना एका महिन्याच्या वैधतेसह नवीन प्लॅन जाहिर करण्याचे आदेश दिले होते.
एअरटेलने हे दोन्ही नवीन प्लॅन आपल्या वेबसाइटवर लिस्ट केले आहेत. 296 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 दिवसांची वैधता असेल. याशिवाय या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएससह 25GB डेटा मिळेल.
Jio ने नुकताच 259 रुपयांचा प्लॅन आणला. ज्यामध्ये एक पूर्ण महिन्याच्या वैधतेसह ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असेल. तुम्ही हा प्लॅन एकाच वेळी अनेक वेळा रिचार्ज करू शकता. प्रत्येक महिन्याची वैधता संपल्यानंतर, नवीन योजना आपोआप सक्रिय होईल. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसही मिळतील. या प्लॅनमध्येही इतर प्लॅनप्रमाणे जिओचे सर्व ॲप्स सबस्क्राइब केले जातील.