□ नवीन शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी
सोलापूर : सोलापूर विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांनी मोबाईल वापरू नये, असा नियम जिल्हा परिषदेने केला. स्टाफरूम वगळता अन्य ठिकाणी शाळेच्या वेळेत मोबाईल वापरणाऱ्या शिक्षकांवर आता दंडात्मक कारवाई होणार आहे. तसेच शाळेच्या वेळेत शैक्षणिक कामाव्यतिरिक्त त्यांना शाळा सोडून जाता येणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीत तसा प्रकार आढळल्यास मुख्याध्यापकांवरही कारवाई होणार आहे. जून 2022 पासून याची अंमलबजावणी होईल.
जूनपासून शिक्षकांना ते ज्या ठिकाणी काम करतात तेथील मुख्यालयात राहणे बंधनकारक असेल. दुसरीकडे, शिक्षकांनी मुलांना शिकविताना तथा स्टाफरूमबाहेर असताना मोबाईल वापरू नये, जेणेकरून मुलांवर विपरीत परिणाम होइल, असे वर्तन नको. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे दिलीप स्वामी (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर) यांनी सांगितले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून दंडाची रक्कम निश्चित केली जाणार आहे. पहिल्यांदा नियम मोडल्यास १०० रुपयांचा द्यावा लागणार दंड, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास होणार २०० रुपयांचा दंड , दोनवेळा दंडात्मक कारवाई होऊनही मोबाईल वापरल्यास मोबाईल जप्त केला जाणार आहे.
Big decision – Mobile ban on teachers in Solapur schools now!
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी शिक्षकांना गणवेशाची सक्ती केली होती. पण, काही महिन्यांनी तो नियम राहिला नाही. शिक्षकांना मुख्यालयात राहण्याचे ग्रामविकास व शालेय शिक्षण विभागाने अनेकदा आदेश काढूनही बहुतेक शिक्षक नुसते प्रमाणपत्र सादर करतात, प्रत्यक्षात ते शहराच्या ठिकाणी राहतात, असे निदर्शनास आले. त्यामुळे आता जूनपासून शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी होणार आहे.
दुसरीकडे, नवीन शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांना शाळेत मोबाईल घेऊन जाता येइल, पण अध्यापन करताना किंवा व्हरांड्यात त्यांना मोबाईल वापरता येणार नाही. तसेच शाळेच्या वेळेत शैक्षणिक कामाव्यतिरिक्त त्यांना शाळा सोडून जाता येणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीत तसा प्रकार आढळल्यास मुख्याध्यापकांवरही कारवाई होणार आहे. शिक्षकांच्या वर्तनाचे लहान मुले अनुकरण करतात, त्यामुळे जून २०२२ पासून म्हणजेच नवीन शैक्षणिक वर्षापासून या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना शिकविताना फोन आल्यास अध्यापनात व्यत्यय येऊ शकतो , वर्गात मुले असताना मोबाईलवर बोलणाऱ्या शिक्षकांमुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो , शिक्षक मोबाईल वापरतात म्हणून मुलेही वर्गात मोबाईल आणू शकतात, यामुळेच हा मोबाईल बंदीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.