सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर भल्या पहाटे शोभेची दारू वाहतूक करणारा माल ट्रक पेटल्याने ‘द बर्निंग ट्रक’चा थरार पहावयास मिळाला. यात फटाकेचे साहित्य असल्याने सतत फटाक्यांचे स्फोट होत होते. त्यामुळेच जवळ कोणी जाण्यास धजावत नव्हते.
हा मालट्रक जळून लाखो रुपयांच्या फटाक्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापपर्यंत याबाबत फिर्याद देण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. ही घटना आज (बुधवारी) पहाटे ३.३० च्या सुमारास महामार्गावरील आकुंभे (ता. माढा) गावाच्या शिवारात घडली.
सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णी जवळील आकुंभे गावानजीक शोभेची दारु व फटाके घेवून जाणारा मालट्रक अचानकपणे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. ट्रक पेटल्यानंतर शोभेची दारु व फटाक्याच्या आवाजाने हा परिसर अक्षरक्षः दणाणून गेला होता. या दुर्घटनेत मालट्रक जळाला असला तरी कोणतीही जिवीत दुर्घटना मात्र घडलेली नाही.
आज पहाटे साडेतीनच्या सुमारास हि घटना घडली आहे. घटना घडली त्यावेळी या परिसरात वीजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु होता. ट्रकवर वीज पडल्यानेच ट्रक पेटला असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ट्रकला आग लागल्याच लक्षात येताच चालकाने हुशारी दाखवून ट्रक बाजूला घेवून उभा करुन स्वतः बाजूला गेला. त्यामुळे त्याचा जीव वाचला.
या दुर्घटने दरम्यान, ट्रक चालकाने सावधानता बाळगत ट्रक सोडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हा ट्रक संपूर्णपणे फटाक्यांनी भरलेला असल्या कारणाने जवळपास दोन तास सोलापूर पुणे हायवेवर फटाक्यांची आतिषबाजी सुरुच होती. वीज ट्रकवर पडल्याने हा ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला आहे.
Thunder of ‘The Burning Truck’ in Solapur in the morning, continuous explosion of firecrackers
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या घटनेमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये होते. या घटनेतील मालट्रक चालकाने चाणाक्षपणे महामार्गाच्या बाजूला मालट्रक उभा करून पळून ल्याने त्यांचा जीव वाचला.
मालट्रकमध्ये शोभेची दारु व फटाके असल्याने आग लागताच त्याचे स्फोटक आवाज होवू लागले. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वहातूकही ठप्पा झाली होती. घटनेची माहिती कळाल्यानंतर टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेवून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून सुरळीत केली. या घटनेत जिवीतहानी झालेली नसली तरी वित्तीय नुकसान मात्र मोठ झालं आहे.
आज बुधवारी पहाटे टेंभुर्णी पोलिसांना पुणे-सोलापूर महामार्गावर आकुंभे शिवारात मालट्रक पेटला असल्याचे समजताच अपघात पथकाचे ए. एस. आय अभिमान गुटाळ, चालक क्षीरसागर हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मालट्रक संपूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. आग लागल्याचे समजताच चालकाने ट्रक बाजूला घेऊन उभा केला. मालट्रकमध्ये फटाके (शोभेची दारू) असल्याने सतत फटाक्यांचे स्फोट होत असल्याने कोणालाही जवळ जाता येत नव्हते.
मोठ्या आवाजाने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. ही आग लागल्यावर पोलिसांनी सुरक्षितपणे वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळविली. अग्निशमन बंब उपलब्ध झाला नसल्याने पोलिसांनी वरवडे टोल प्लाझा येथील पाण्याच्या टँकर मागवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचाही उपयोग झाला नाही. ही आग विझविण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस कर्मचारी यांनीही प्रयत्न केले.
या मालट्रकमधील माल कोठून आला व तो कोठे निघाला होता. हे अद्याप समजू शकलेले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास ए.एस.आय अभिमान गुटाळ हे करीत आहेत.