सोलापूर : सोलापूर शहरातील व परिसरातील चार जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
सौदागर क्षिरसागर (वय 33, रा. समर्थ नगर बाळे), सोमनाथ सर्वगोड (वय 27,रा.भीमनगर बाळे), विलास कवडे (वय 35,रा. मारुती गल्ली बाळे), सागर तोडकरी (वय 34,रा. वाणी गल्ली बाळे),असे तडीपार करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहे. सहा महिन्यासाठी यांना सोलापूर शहर व जिल्हा उस्मानाबाद व पुण्यातील इंदापूर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसावा म्हणून पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी त्यांना तडीपार करण्याचे आदेश दिलेले आहेत.
सोलापूर शहरामध्ये आपला उद्देश साध्य करण्याच्या हेतूने संघटीतरीत्या टोळी प्रस्थापित करून टोळीच्या माध्यमातून आपखुशीने दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे, हॉस्पिटलमध्ये दंगा करून तोडफोड करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे यांच्यावर दाखल आहेत. यापुढे देखील डॉक्टर व हॉस्पिटल वर हल्ला करणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांनी दिला आहे.
□ अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणाला पोलीस कोठडी
सोलापूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची निंदनीय घटना एमआयडीसी परिसरात उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी आकाश माने (वय २२ रा.स्वागत नगर) याला बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत अटक करून ५ दिवसाची पोलीस कोठडी घेतली.
Four deported from Solapur; Hospital riots and vandalism
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आकाश माने याने त्या अल्पवयीन मुलीला आपल्या लग्नाबद्दल बोलायचे आहे, असे म्हणत स्वागत नगर येथील केंगनाळकर शाळेजवळील मित्राच्या खोलीत नेला. आणि तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार त्याने दोन महिन्यापूर्वी दोन ते तीन वेळा केला अशा आशयाची फिर्याद मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी आरोपीला अटक करून १७ एप्रिल पर्यंतची पोलिस कोठडी घेतली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक पेटकर करीत आहेत.
□ बायपासवरील वाटमारीत फर्निचर विक्रेत्याला तिघांनी रात्री लुटले
बार्शी : पेट्रोलअभावी गाडी बंद पडल्याचा बहाणा करुन बायपासवर जाणार्या वाहनास मदत मागून तिघांनी सोलापूरच्या फर्निचर विक्रेत्याला लुटल्याचा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला. याबाबत महेश नागनाथ माने, (रा. 80, बसवराज निलय नगर ,जुळे सोलापूर, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महेश माने हे आपल्या वाहनातून फिरुन फर्निचर विक्री करतात. ते सायंकाळी बार्शीत येवून तावरवाडीला गेले होते. तेथून परतून आपल्या कार मधून रात्री 10:15 वा.चे सुमारास ते लातूर कडे जाण्यासाठी बायपास वरुन निघाले. मौजे गाताचीवाडी गावाच्या पश्चिमेस 200 ते 300 मीटर अंतरावर ते आले असताना एक मास्कधारी व्यक्ती आपली बिगर क्रमांकाची दुचाकी ढकलत घेवून जात असल्याचे त्यांना दिसले.
त्यावेळी समोरच्या बाजूने वाहन आल्याने त्यांनी गाडीचा वेग कमी केला. त्याचवेळी त्याने गाडीला हात केल्याने त्यांनी गाडी थांबवली. गाडी मधील पेट्रोल संपले आहे. पुढे थोड्याच अंतरावर पेट्रोलपंप आहे, तिथे तुम्ही मला सोडा असे म्हणत तो गाडी जवळ आला आणि त्याने माने यांच्या कारची चावी काढून खाली टाकली. त्याचवेळी गाडीचे डावीकडील बाजूने आणखी दोन अनोळखी इसम आले. त्यातील एकाने पाठीला चाकू लावला. दुसर्याने हातातील सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम मागितली. घाबरून त्यांनी जवळील रु. 1,04,500 रुपयांचा सर्व ऐवज त्यांना दिला. त्यानंतर ऐवज घेऊन पोबारा केला.