मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला तर ‘मी हिमालयात जाईन’ असे विधान केले होते. आता निवडणूकीत काँग्रेस उमेदवार जयश्री पाटील यांचा विजय झाल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटलांचा हिमालयात असणारा फोटो फोटोशॉप करत ‘मी पोचलो रे हिमालयात’ अशा प्रकारचे मीम्स आव्हाड यांनी शेयर केले आहे.
काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना एकूण 94,767 मते तर भाजपच्या सत्यजित कदम यांना एकूण 76,123 मते मिळाली आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसघांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 18901 मतांनी विजय मिळवला आहे.
या पराभवासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चांगलीच कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. कारण निवडणुकीपूर्वी २ नोव्हेंबर २०२० रोजी बोलताना पाटील यांनी विरोधकांना कोल्हापुरमध्ये पराभूत झालो तर हिमालयात निघून जाईन असं खुलं आव्हान दिलं होतं. कोल्हापुरातून पळून आल्याचा टोला विरोधकांकडून सातत्याने लगावला जातो, असा संदर्भ देत पाटील यांनी कोथरूडमधून निवडणूक लढण्याचा किस्सा या कार्यक्रमात सांगितला होता. पुण्यात सुरक्षित म्हणून नव्हे तर पक्षाने सांगितले म्हणून आलो. माझी कोल्हापूर जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी होती. पण पक्षाच्या आदेशानुसार मी पुण्यात लढण्यासाठी आलो, असे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.
मी कोल्हापुरमधील मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आजही तयार आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा. मी तेथून निवडणूक लढवेल. मला हरणे माहीत नाही. निवडून नाही आलो तर हिमालयात निघून जाईल, अशा शब्दांत पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिलं होतं. भाजपच्या आजच्या पराभवानंतर महाविकास आघाडीकडून चंद्राकांतदादांना त्यांच्या या आव्हानाची आठवण करुन दिली जात असून आता हिमालयात कधी जाणार असा सवाल विचारला जात आहे.
‘I have reached the Himalayas’; Chandrakantdada’s vulgarity came to an end
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत आघाडीने बाजी मारली असली तरी सोशल मिडीयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ट्रोल होत आहे. हरलो तर हिमालयात जाईल, या त्यांच्या घोषणेवरुन त्यांना टार्गेट केलं जात असताना चंद्रकांत दादा यांनी आता मी हरलो तर हिमालयात जाईल असं म्हटल्याची सारवासारव केली आहे.
इथंवरचं न थांबता शिवसेनेने कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांचे साधूच्या वेशातील फोटो असलेले बॅनर्स लावले असून त्यावर “हिमालय की गोद में” असा संदेश लिहीला आहे. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून ट्विटरवरती चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे ही घोषणा चंद्रकांतदादांच्या चांगलीच अंगलट आली आहे.
आमचे उमेदवार नाना पाटील हरले आहे. मी हिमालयात जाण्याची घोषणा मी हरलो तर हिमालयात जाईल अशी केली होती, अशी सारवासारव दादांनी केली आहे. कोल्हापुरात प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हिमालयाच्या मुद्द्यावरच चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती.
दोनच दिवसांपूर्वी इथल्या मंगळवार पेठेत चंद्रकांत पाटील प्रचारासाठी पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोषण करण्यात आला. ‘दादा हिमालयात जावा’ अशीही घोषणा यावेळी तरुण देत होते. अखेर कार्यकर्त्यांचा हा संताप पाहून चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांसोबत तिथून काढता पाय घेतला होता.