जालना : जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथे गावाच्या प्रवेशद्वाराला नाव देण्यावरून दोन गटात मोठा राडा झाला. तसंच गावात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत बंदोबस्तावरील अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस व्हॅनच्या, अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या काचा देखील फुटल्या आहेत. Bhokardan Jalna: Radha in two groups: also throwing stones at police; 5 injured in the shooting
महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका गावात दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. दगडफेकीच्या या घटनेत 5 पोलीस जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. पोलिसांनी या प्रकरणी 20-25 आरोपींना अटक केली आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावात प्रवेश करणार होती. आणि ज्या ठिकाणी ती मूर्ती बसवणार होते त्याला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात येणार होते, मात्र या विषयावर चर्चा न होता दोन समाजात वाद निर्माण झाला. वाद इतका वाढला की दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक केली.
जमाव काबूत येत नसल्यामुळे तातडीने एसआरपीएफची एक तुकडी बोलावून तैनात करण्यात आली आहे. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे हे घटनास्थळी ठाण मांडून असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/539715217706212/
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या.दरम्यान पोलिसांनी सुमारे 20 ते 25 जणांना अटकही केली आहे. चांदई येथे दोन गटात हाणामारी झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच आरोपींवर कडक कारवाईची तयारी सुरू आहे.
एक गट गोपीनाथ मुंडे यांचे नाव गावाच्या कमानीला देण्यात यावे, अशी मागणी करत होता. तर दुसरा गट छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कमानीला कायम ठेवावे, अशी मागणी करत होता. शिवाजी महाराज यांचा पुतळा काढण्यासाठी आलेल्या जेबीसी व क्रेन यंत्रावर दगडफेक करण्यात आली. पोलीस प्रशासनातर्फे जमावाला शांत करण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. यावेळी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या सहाय्याने शिवाजी महाराज यांचा पुतळा काढण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या आदेशानुसार भोकरदनसह जालना येथून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. यावेळी संतप्त जमावाने दोन्ही गाड्यांवर दगडफेक केली. झालेल्या दगडफेकीत दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून भोकरदन येथील अग्निशामक दलाचे चार कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. यावेळी अग्निशमन विभाग प्रमुख भूषण पळसपगार, वाहन चालक सी. आर. सरकटे, फायरमन वैभव पुणेकर व रईस काद्री हे अग्निशामक दलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539658467711887/