Day: May 20, 2022

  • tragic truck accident पेट्रोल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात; आगीत होरपळून 9 जणांचा मृत्यू

    tragic truck accident पेट्रोल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात; आगीत होरपळून 9 जणांचा मृत्यू

     

    चंद्रपूर : येथील अजयपूर गावाजवळ चंद्रपूर-मूल मार्गावर 2 ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर ट्रकला आग लागली. या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांची अद्यापही ओळख पटलेली नाही. पेट्रोल वाहतूक करणाऱ्या ट्रकची आणि लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक झाली. टायर फुटल्याने आग भडकली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. A tragic truck accident; 6 killed in fire in Chandrapur

    काल गुरुवारी ( दि. १९ मे) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वडसा वरून चंद्रपूरला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक (क्रमांक एमएच ३१ सीक्यू २७७० ) आणि चंद्रपूरवरून मूलकडे जाणारा डीझल टँकर (क्रमांक एमएच ४० बीजी ४०६०) या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रक ला आग लागली. आगीने बघता – बघता भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक व त्यामध्ये असलेले ९ जण जळून खाक झाले.

    डिझेल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर टँकरमधील डिझेलमुळे भीषण आगीचा भडका उडालाय. ट्रकचे टायर फुटल्याने आग अधिकच पसरली. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर ही आग विझवली. या आगीत मृत पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह जळून खाक झाले.

     

    स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

     

    https://www.facebook.com/109399567404448/posts/544732437204490/

     

    लाकूड भरलेल्या ट्रक मध्ये वाहनचालक अजय सुधाकर डोंगरे (वय 30, रा. बल्लारपूर), प्रशांत मनोहर नगराळे (वय33), मंगेश प्रल्हाद टिपले (वय 30), महिपाल परचाके (वय25), बाळकृष्ण तुकाराम तेलंग (वय 46), साईनाथ बापूजी कोडापे (वय 40 रा. नवी दिल्ली), संदीप रवींद्र आत्राम ( वय 22, रा. तोहोगाव कोठारी) असे मृताची नावे आहेत. हे सर्व मजूर लाकूड उतरविण्यासाठी चंद्रपूरला येत होते. डीझेल टँकर मधील वाहनचालक हनिफ खान (वय 35 रा. अमरावती), कंडक्टर अजय पाटील (वय 36 वर्धा )हे दोघेही ट्रकला लागलेल्या आगीत होरपळून मृत पावले. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये नजरेस पडली. प्लास्टिक पोत्यांमधून हे शव चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

    रात्री झालेला हा अपघात इतका भयंकर आणि भीषण होता की रस्ताभर आगीचे लोळ आणि त्यानंतर धुराचे लोट पसरले होते. आगीच्या लोळांमुळे जंगलातल्या झाडांनाही आग लागली. या अपघाताची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा मूल आणि चंद्रपूर या दोन्ही ठिकाणची अग्निशमन पथकं रवाना झाली. अग्निशमन दल, पोलीस या ठिकाणची पथकं घटनास्थळी दाखल झाली. या ठिकाणी आग नियंत्रणात आणायला सकाळ उजाडली होती.

     

    https://www.facebook.com/109399567404448/posts/544645640546503/

  • आमदार स्थानिक विकास योजनेतून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य

    आमदार स्थानिक विकास योजनेतून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य

     

    सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे  यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून आर्थिक सहाय्यातून क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी निधी दिला आहे. MLA Praniti Shinde financial assistance to international players from MLA local development scheme

    सोलापुरातील आंतरराष्ट्रीय खेळाडूं प्रगती श्रीरंग सोलनकर (लॉन टेनिस )  व प्रज्ञेश समित यादवाड (स्केटींग ) या दोन आंतर राष्ट्रीय खेळाडूंना प्रत्येकी 50,000/- रुपये इतके आर्थिक सहाय्य त्यांना क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी देण्यात आले. त्यानिमित खेळाडूंचा सत्कार करून आमदार प्रणिती शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. दोन्ही खेळाडूंनी ऑलिपिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करावे व सोलापूरचे नांव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या.

    जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दोन संगणक  आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आले. या प्रसंगी खेळाडूंच्या पालकांनी  आमदार प्रणिती शिंदे केलेल्या आर्थिक मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त करुन दोन्ही खेळाडू सोलापूरचे नाव उज्ज्वल करतील, असे सांगितले.

    जिल्हा क्रीडा अधिकारी  नितीन तारळकर यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे पृष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्याच्या भावी  स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी कार्यासन अधिकारी सत्येन जाधव, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे , क्रीडा अधिकारी तानाजी मोरे व भैरवनाथ नाईकवाडी, वरिष्ठ लिपिक शैलेंद्र माने,आमदार यांचे स्वीय सहाय्यक मोहम्मद काझी, स्केटींग संघटनेचे दीपक घंटे  व कार्यालयातील सर्व कर्मचारी व पालक उपस्थित होते.

     

    स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

     

    https://www.facebook.com/109399567404448/posts/544656223878778/

    □ इंदिरा गांधी स्टेडीयमच्या भाढेवाढबाबत सकारात्मक भूमिका

    सोलापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशन व सोलापुरातील खेळाडू , पालकवर्ग , क्रिकेट क्लब व अपायर असोसिएशनचे सर्व उपस्थित पदधिकारी यांच्याशी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांची इंदिरा गांधी स्टेडीयम च्या भाढे वाढ विरोधात सकारात्मक चर्चा झाली.

    आयुक्तांनी सोलापूरचे युवा क्रिकेट वाढवण्यासाठी भाडे कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या दोन दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असे सांगितले.

    आयुक्तांनी दिलेल्या आश्वसनामुळे क्लब, खेळाडू, अंपायर , पालकवर्ग यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. यावेळी नागेश वल्याळ , प्रकाश भुतडा,चंदू रेंबर्सू , रोहीत जाधव ,सत्यजीत जाधव , संजय वडजे , संजय बडवे, राजेंद्र गोटे,  मल्लिनाथ याळगी , नागेश राव , श्रीनिवास शिवाल , आतिक शेख ,आव्हाड , संतोष बडवे ,रोहन ढेपे , किरण मणियार , स्नेहल जाधव उपस्थित होते.

     

     

  • पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून घरात घुसून चोरी;  सातजणांविरुद्ध गुन्हा

    पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून घरात घुसून चोरी; सातजणांविरुद्ध गुन्हा

     

    सोलापूरआपल्या विरुद्ध पोलिसात तक्रार देण्यासाठी मोनू सोरटे याला पोलीस ठाण्यात का नेले होते? या कारणावरून घरात घुसून कपाटातील रोख रकमेसह ६७ हजाराचे दागिने पळवून नेले. ही घटना टाकळी (ता.माढा) येथे बुधवारी (ता. 18) पहाटेच्या सुमारास घडली. Burglary due to reporting to police; Crime against 7 persons

    या प्रकरणात बाळू भिमराव नगरे (वय ४० रा.टाकळी) यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी सुधिर भारत कळसाईत, दादा कळसाईत, नवनाथ कळसाईत, आणि अन्य चौघे  अशा ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मोनू सोरटे याला तू गाडीवर बसवून माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यासाठी का आला होता, असे म्हणत सातजणांनी हा प्रकार केला, अशी नोंद पोलिसात झाली आहे.

    □ यात्रेची वर्गणी दिली नाही म्हणून घरात घुसून मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    सोलापूर – यात्रेची वर्गणी दिली नाही शिवाय पालखी थांबून दर्शन का घेतले? या कारणावरून घरात बसून लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना वरळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात सोलापूर तालुक्याचा पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    या संदर्भात सुनील नागनाथ देवकर (वय २९ रा.वरळेगाव) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलीसांनी लक्ष्मण बनसोडे, श्रीमंत हक्के, मारुती देवकर, भारत बनसोडे आणि सुनील नवले (सर्व रा. वरळेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार सूळ पुढील तपास करीत आहेत.

     

    स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

     

    https://www.facebook.com/109399567404448/posts/544656223878778/

     

    □ माहेरच्या लोकांना का बोलावली म्हणून विवाहितेस मारहाण; पती आणि सासू विरुद्ध गुन्हा

    सोलापूर – माहेरच्या लोकांना का बोलावली या कारणावरून काठी आणि  लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत विवाहिता जखमी झाली. ही घटना उपळवाटे (ता.माढा) येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

    यासंदर्भात स्वाती ज्ञानेश्वर घोरपडे (वय २३ रा.उपळवाटे) हिने टेम्भूर्णी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी स्वातीच्या पती ज्ञानेश्वर घोरपडे आणि सासू संगीता घोरपडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्वाती घोरपडे हिची आई, वडील आणि भाऊ असे घरी आले होते. रात्री झालेल्या भांडणाच्या कारणावरून पहाटेच्या सुमारास पतीने काठीने तर सासुने तिला लाथाबुक्क्याने मारहाण केली.पतीने तिच्या मुलाचा हिसकावून घेऊन त्याला ठार मारण्याची धमकी दिली. अशी नोंद पोलिसात झाली हवालदार बारकीले पुढील तपास करीत आहेत.

    ■ इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळवून देतो म्हणून ८१ लाखाला गंडा

    सोलापूर : इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळवून देतो म्हणून ८१ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून ते १४ एप्रिल २०२२ दरम्यान चाटी गल्ली सोलापूर येथे घडली.

    याप्रकरणी विजयकुमार व्यंकटेश विटकर (वय-३८,रा.भवानी पेठ,मड्डी वस्ती,सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून कृष्णा (पुर्ण नाव माहीत नाही), मनीष ठाकुर,ब्रिज मोहन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी विटकर यांनी सन २०१४ मध्ये सोलापूर येथे आयसीआयसीआय बँकेमधून मॅक्स लाइफ इन्शुरन्सची पॉलिसी काढली होती.त्या पॉलिसीचा हप्ता वर्षाला २४ हजार रुपये भरत होते.त्यानंतर फिर्यादी विटकर यांनी सुमारे तीन वर्षे पॉलिसीचे हप्ते भरले. परंतु त्यानंतर पैसे भरणे बंद केले होते.दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून ते दि.१४ एप्रिल २०२२ रोजी दरम्यान वरील संशयित आरोपी यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक ८७४२९४५१४७, ७५३४९५६११६, ९९५३२८९३४१ या मोबाईल क्रमांकाच्या धारकाने एस बँकेत खाते क्रमांक ००१६८५८००००२१७४ या क्रमांकाचा धारक असे संगणमत करून फिर्यादी विजयकुमार विटकर यांना इन्शुरन्स पॉलिसीचे एक कोटी नऊ लाख रुपये मिळवून देतो असे सांगितले.

    त्यानंतर ती रक्कम प्राप्त करून न देता व फिर्यादी कडून वरील संशयित आरोपींनी फिर्यादी विटकर यांची वेळोवेळी प्रोसेसिंग फी,कोड चार्जेस,ट्रान्सफर चार्जेस अशी वेगवेगळी कारणे सांगून विश्वासाने घेतलेली एकूण ८१ लाख ३९ हजार रुपये रक्कम परत न करता ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे हे करीत आहेत.

     

    https://www.facebook.com/109399567404448/posts/544645640546503/

  • स्टेरिंग रॉड तुटल्याने एसटी बस पलटली, सोलापुरात मुसळधार पाऊस

    स्टेरिंग रॉड तुटल्याने एसटी बस पलटली, सोलापुरात मुसळधार पाऊस

     

    सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी जवळ एसटी बसचा अपघात झाला आहे. बसचे स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली आहे. ही घटना आज शुक्रवारी (ता. 20) सकाळी दहाच्या सुमारास घडली. यावेळी बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. ST bus overturned due to broken steering rod, torrential rain in Solapur

    या बसमध्ये साधारणपणे ५० ते ६० प्रवाशी प्रवास करत होते. स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    बबलाद परमानंद तांड्यावरून अक्कलकोटकडे निघालेली एसटी बस कलप्पावाडी गावापासून अवघ्या अर्धा किलो मिलीमीटर अंतरावर रस्त्यावरच्या खड्ड्यात बस आदळल्याने अचानकपणे बसची स्टेरिंग रॉड तुटल्याने मल्लिकार्जुन बंडगर यांच्या शेतात बस पलटी झाली.

    चालक जाधव यांच्या प्रसंगासवधानमुळे सहा प्रवाशी किरकोळ जखमी झाली आहेत. .स्थानिक लोकांच्या मदतीने बाकीच्या सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहेत. या दरम्यान अपघात झाल्याचे कळताच कलप्पावाडी व परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले.

    सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही. मात्र काही जण जखमी झाले आहेत. काही जणांना मुका मार बसला आहे. त्यानंतर तातडीने त्या ठिकाणी एम्ब्युलन्स बोलावण्यात आली जखमींना तातडीने गावातच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

    तात्काळ रुग्णवाहिका बोलावून पुढील उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. यावेळी मारुती सोनकर, जयकुमार जानकर संजय पांढरे, शंकर जानकर मनोहर देवकते, सलीम मासुलदार यांच्यासह गावकारी मंडळ मदतीसाठी धावून आले.

    https://www.facebook.com/109399567404448/posts/544581257219608/

     

    □ सोलापुरात काल मुसळधार पाऊस

    शहरात काल गुरुवारी (ता. 19) पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. सायंकाळपर्यंत ७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एकाच पावसात शहर पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. काल सायंकाळी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला. मोहोळ, नरखेड, पेनूर, पंढरपूर शहर व परिसर, पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर), पिंपळनेर (ता. माढा), मंद्रूप, मंगळवेढा शहर व ग्रामीण परिसर आदी ठिकाणी पाऊस पडला. आज ही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. 

    शहरात सकाळपासून मॉन्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कालपासून ढगाळ वातावरण होते.  सकाळी ११.३० च्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यानंतर दुपारी, सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह चांगला पाऊस झाला. सायंकाळपर्यंत शहरात ७ मिलिमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद झालीय.

     

    https://www.facebook.com/109399567404448/posts/544363057241428/

  • drowned  Pune district दुःखद ! पुणे जिल्ह्यात पाच विवाहित महिलेसह 9 जणांचा बुडून मृत्यू

    drowned Pune district दुःखद ! पुणे जिल्ह्यात पाच विवाहित महिलेसह 9 जणांचा बुडून मृत्यू

    पुणे : पुणे जिल्ह्यात 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चासकमान आणि भाटघर धरणात घडलेल्या या घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. भाटघर धरणात बुडून पाच विवाहित महिलांचा मृत्यू झाला तर एका मुलीला वाचविण्यात यश आले. Sad! Nine people, including five married women, drowned in Pune district

    रितीन डी. डी, नव्या भोसले, परीक्षित आगरवाल व तनिष्का देसाई या विद्यार्थ्यांचा चासकमान धरणात बुडून मृत्यू झाला. तर खुशबू संतोष राजपूत, मनिषा लखन राजपूत, चांदणी शक्ती राजपूत, पूनम संदीप राजपूत, मोनिका रोहित चव्हाण यांचा भाटघर धरणात बुडून मृत्यू झाला. भाटघर धरणात पाच विवाहित महिलांचा बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, या सर्व महिला या कंजर भट समाजाच्या असून एक मुलगी सुदैवाने बचावली आहे.

    भाटघर धरणाच्या न-हे गावच्या तीरावर गुरुवारी (ता.१९) सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नरे गावातील कातकरी समाजाच्या तरुणाने तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. ही दुर्घटना काल गुरूवारी (दि.19) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, राजगड चे पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. सह्याद्री सर्च अंड रेस्क्यू फोर्स च्या जवानांनी शोधकार्य सुरू केले आहे.

     

    स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

     

    https://www.facebook.com/109399567404448/posts/544468773897523/

    घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबू लंकेश रजपूत (वय 19, रा बावधन), मनीषा लखन रजपूत (वय 20), चांदनी शक्‍ती रजपूत (वय 21), पूनम संदीप रजपूत (वय 22, तिघीही रा. संतोषनगर, हडपसर पुणे) मोनिका रोहित चव्हाण (वय 23, रा नऱ्हे, पुणे), अशी मृत्यू महिलांची नावे आहेत. यातील खूशबू आणि चांदनी यांचे मृतदेह अजून मिळालेली नाहीत, उर्वरित तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत.

    धरणात एकूण सहाजण बुडाले होते. त्यातील एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. भाटघर धरणालगतच्या नऱ्हे गावच्या हद्दीत सायंकाळी दुर्घटना घडली. नऱ्हे गावातील कातकरी समाजाच्या तरुणाने तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. घटनास्थळी राजगडचे पोलीस दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.

     

    (more…)

  • Raj Thackeray Ayodhya tour  राज ठाकरेंचा ‘तुर्तास अयोध्या दौरा स्थगित !’ रविवारच्या सभेत सविस्तर बोलणार

    Raj Thackeray Ayodhya tour राज ठाकरेंचा ‘तुर्तास अयोध्या दौरा स्थगित !’ रविवारच्या सभेत सविस्तर बोलणार

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. याविषयी पुण्यातील सभेत सविस्तर बोलू, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तब्येतीच्या कारणाने हा दौरा स्थगित केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा याआधी भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी दिला होता. Raj Thackeray’s ‘Turtas Ayodhya tour postponed!’ Will speak in detail at Sunday’s meeting

    राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित केला गेल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाच्या दुखण्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे डॉक्टरांचा सल्ल्यानुसार त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचं सांगितलं जात आहे.

     

    एक ते दीड वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना हा त्रास जाणवत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी 10 एक्स्प्रेस रेल्वेगाड्या बूक करण्यासंदर्भातही बोलणी सुरु होती. मात्र, आता राज ठाकरे यांनीच प्रकृतीच्या कारणास्तव दौरा रद्द केला आहे.

     

    स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

     

    https://www.facebook.com/109399567404448/posts/544089737268760/

     

    राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. यात त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असून रविवारी (ता. 22) पुण्यात होणाऱ्या सभेत याबाबत सविस्तर बोलू असं म्हटलं आहे. पुण्यात २१ मे रोजी नदीपात्रात होणारी मनसेची जाहीर सभा देखील पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आली होती. पण आता ही सभा २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला मंच येथे होणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. नदीपात्रात जाहीर सभा घेण्याचं आम्ही ठरवलं होतं. पण हवामान खात्यानं त्यादिवशी पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि कार्यक्रत्यांना चिखलात बसवणं योग्य ठरणार नसल्याचे कारण देत सभा रद्द केली.

    राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसैनिकांनी जय्यत तयारीला सुरुवात केली होती. पण उत्तर प्रदेशातून राज यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला. भाजपाचे खासदार बृजभूषण चरण सिंह यांनी राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येला यावं अशी मागणी केली.

     

    बृजभूषण सिंह यांनी याच पार्श्वभूमीवर मोठं शक्तीप्रदर्शन देखील केलं. तसंच ५ जून रोजी अयोध्येत राज ठाकरेंना येऊ देणार नाही. त्यासाठी ५ लाख लोक राज ठाकरेंना अडवतील असं म्हणत बृजभूषण सिंह यांनी शड्डू ठोकला आहे. त्यानंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर ठाम होते.

    https://www.facebook.com/109399567404448/posts/544363057241428/