सोलापूर – आपल्या विरुद्ध पोलिसात तक्रार देण्यासाठी मोनू सोरटे याला पोलीस ठाण्यात का नेले होते? या कारणावरून घरात घुसून कपाटातील रोख रकमेसह ६७ हजाराचे दागिने पळवून नेले. ही घटना टाकळी (ता.माढा) येथे बुधवारी (ता. 18) पहाटेच्या सुमारास घडली. Burglary due to reporting to police; Crime against 7 persons
या प्रकरणात बाळू भिमराव नगरे (वय ४० रा.टाकळी) यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी सुधिर भारत कळसाईत, दादा कळसाईत, नवनाथ कळसाईत, आणि अन्य चौघे अशा ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मोनू सोरटे याला तू गाडीवर बसवून माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यासाठी का आला होता, असे म्हणत सातजणांनी हा प्रकार केला, अशी नोंद पोलिसात झाली आहे.
□ यात्रेची वर्गणी दिली नाही म्हणून घरात घुसून मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर – यात्रेची वर्गणी दिली नाही शिवाय पालखी थांबून दर्शन का घेतले? या कारणावरून घरात बसून लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना वरळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात सोलापूर तालुक्याचा पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात सुनील नागनाथ देवकर (वय २९ रा.वरळेगाव) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलीसांनी लक्ष्मण बनसोडे, श्रीमंत हक्के, मारुती देवकर, भारत बनसोडे आणि सुनील नवले (सर्व रा. वरळेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार सूळ पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/544656223878778/
□ माहेरच्या लोकांना का बोलावली म्हणून विवाहितेस मारहाण; पती आणि सासू विरुद्ध गुन्हा
सोलापूर – माहेरच्या लोकांना का बोलावली या कारणावरून काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत विवाहिता जखमी झाली. ही घटना उपळवाटे (ता.माढा) येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
यासंदर्भात स्वाती ज्ञानेश्वर घोरपडे (वय २३ रा.उपळवाटे) हिने टेम्भूर्णी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी स्वातीच्या पती ज्ञानेश्वर घोरपडे आणि सासू संगीता घोरपडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्वाती घोरपडे हिची आई, वडील आणि भाऊ असे घरी आले होते. रात्री झालेल्या भांडणाच्या कारणावरून पहाटेच्या सुमारास पतीने काठीने तर सासुने तिला लाथाबुक्क्याने मारहाण केली.पतीने तिच्या मुलाचा हिसकावून घेऊन त्याला ठार मारण्याची धमकी दिली. अशी नोंद पोलिसात झाली हवालदार बारकीले पुढील तपास करीत आहेत.
■ इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळवून देतो म्हणून ८१ लाखाला गंडा
सोलापूर : इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळवून देतो म्हणून ८१ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून ते १४ एप्रिल २०२२ दरम्यान चाटी गल्ली सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी विजयकुमार व्यंकटेश विटकर (वय-३८,रा.भवानी पेठ,मड्डी वस्ती,सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून कृष्णा (पुर्ण नाव माहीत नाही), मनीष ठाकुर,ब्रिज मोहन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी विटकर यांनी सन २०१४ मध्ये सोलापूर येथे आयसीआयसीआय बँकेमधून मॅक्स लाइफ इन्शुरन्सची पॉलिसी काढली होती.त्या पॉलिसीचा हप्ता वर्षाला २४ हजार रुपये भरत होते.त्यानंतर फिर्यादी विटकर यांनी सुमारे तीन वर्षे पॉलिसीचे हप्ते भरले. परंतु त्यानंतर पैसे भरणे बंद केले होते.दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून ते दि.१४ एप्रिल २०२२ रोजी दरम्यान वरील संशयित आरोपी यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक ८७४२९४५१४७, ७५३४९५६११६, ९९५३२८९३४१ या मोबाईल क्रमांकाच्या धारकाने एस बँकेत खाते क्रमांक ००१६८५८००००२१७४ या क्रमांकाचा धारक असे संगणमत करून फिर्यादी विजयकुमार विटकर यांना इन्शुरन्स पॉलिसीचे एक कोटी नऊ लाख रुपये मिळवून देतो असे सांगितले.
त्यानंतर ती रक्कम प्राप्त करून न देता व फिर्यादी कडून वरील संशयित आरोपींनी फिर्यादी विटकर यांची वेळोवेळी प्रोसेसिंग फी,कोड चार्जेस,ट्रान्सफर चार्जेस अशी वेगवेगळी कारणे सांगून विश्वासाने घेतलेली एकूण ८१ लाख ३९ हजार रुपये रक्कम परत न करता ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे हे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/544645640546503/