सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून आर्थिक सहाय्यातून क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी निधी दिला आहे. MLA Praniti Shinde financial assistance to international players from MLA local development scheme
सोलापुरातील आंतरराष्ट्रीय खेळाडूं प्रगती श्रीरंग सोलनकर (लॉन टेनिस ) व प्रज्ञेश समित यादवाड (स्केटींग ) या दोन आंतर राष्ट्रीय खेळाडूंना प्रत्येकी 50,000/- रुपये इतके आर्थिक सहाय्य त्यांना क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी देण्यात आले. त्यानिमित खेळाडूंचा सत्कार करून आमदार प्रणिती शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. दोन्ही खेळाडूंनी ऑलिपिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करावे व सोलापूरचे नांव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दोन संगणक आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आले. या प्रसंगी खेळाडूंच्या पालकांनी आमदार प्रणिती शिंदे केलेल्या आर्थिक मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त करुन दोन्ही खेळाडू सोलापूरचे नाव उज्ज्वल करतील, असे सांगितले.
जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे पृष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्याच्या भावी स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी कार्यासन अधिकारी सत्येन जाधव, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे , क्रीडा अधिकारी तानाजी मोरे व भैरवनाथ नाईकवाडी, वरिष्ठ लिपिक शैलेंद्र माने,आमदार यांचे स्वीय सहाय्यक मोहम्मद काझी, स्केटींग संघटनेचे दीपक घंटे व कार्यालयातील सर्व कर्मचारी व पालक उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/544656223878778/
□ इंदिरा गांधी स्टेडीयमच्या भाढेवाढबाबत सकारात्मक भूमिका
सोलापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशन व सोलापुरातील खेळाडू , पालकवर्ग , क्रिकेट क्लब व अपायर असोसिएशनचे सर्व उपस्थित पदधिकारी यांच्याशी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांची इंदिरा गांधी स्टेडीयम च्या भाढे वाढ विरोधात सकारात्मक चर्चा झाली.
आयुक्तांनी सोलापूरचे युवा क्रिकेट वाढवण्यासाठी भाडे कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या दोन दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असे सांगितले.
आयुक्तांनी दिलेल्या आश्वसनामुळे क्लब, खेळाडू, अंपायर , पालकवर्ग यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. यावेळी नागेश वल्याळ , प्रकाश भुतडा,चंदू रेंबर्सू , रोहीत जाधव ,सत्यजीत जाधव , संजय वडजे , संजय बडवे, राजेंद्र गोटे, मल्लिनाथ याळगी , नागेश राव , श्रीनिवास शिवाल , आतिक शेख ,आव्हाड , संतोष बडवे ,रोहन ढेपे , किरण मणियार , स्नेहल जाधव उपस्थित होते.