चंद्रपूर : येथील अजयपूर गावाजवळ चंद्रपूर-मूल मार्गावर 2 ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर ट्रकला आग लागली. या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांची अद्यापही ओळख पटलेली नाही. पेट्रोल वाहतूक करणाऱ्या ट्रकची आणि लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक झाली. टायर फुटल्याने आग भडकली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. A tragic truck accident; 6 killed in fire in Chandrapur
काल गुरुवारी ( दि. १९ मे) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वडसा वरून चंद्रपूरला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक (क्रमांक एमएच ३१ सीक्यू २७७० ) आणि चंद्रपूरवरून मूलकडे जाणारा डीझल टँकर (क्रमांक एमएच ४० बीजी ४०६०) या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रक ला आग लागली. आगीने बघता – बघता भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक व त्यामध्ये असलेले ९ जण जळून खाक झाले.
डिझेल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर टँकरमधील डिझेलमुळे भीषण आगीचा भडका उडालाय. ट्रकचे टायर फुटल्याने आग अधिकच पसरली. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर ही आग विझवली. या आगीत मृत पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह जळून खाक झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/544732437204490/
लाकूड भरलेल्या ट्रक मध्ये वाहनचालक अजय सुधाकर डोंगरे (वय 30, रा. बल्लारपूर), प्रशांत मनोहर नगराळे (वय33), मंगेश प्रल्हाद टिपले (वय 30), महिपाल परचाके (वय25), बाळकृष्ण तुकाराम तेलंग (वय 46), साईनाथ बापूजी कोडापे (वय 40 रा. नवी दिल्ली), संदीप रवींद्र आत्राम ( वय 22, रा. तोहोगाव कोठारी) असे मृताची नावे आहेत. हे सर्व मजूर लाकूड उतरविण्यासाठी चंद्रपूरला येत होते. डीझेल टँकर मधील वाहनचालक हनिफ खान (वय 35 रा. अमरावती), कंडक्टर अजय पाटील (वय 36 वर्धा )हे दोघेही ट्रकला लागलेल्या आगीत होरपळून मृत पावले. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये नजरेस पडली. प्लास्टिक पोत्यांमधून हे शव चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
रात्री झालेला हा अपघात इतका भयंकर आणि भीषण होता की रस्ताभर आगीचे लोळ आणि त्यानंतर धुराचे लोट पसरले होते. आगीच्या लोळांमुळे जंगलातल्या झाडांनाही आग लागली. या अपघाताची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा मूल आणि चंद्रपूर या दोन्ही ठिकाणची अग्निशमन पथकं रवाना झाली. अग्निशमन दल, पोलीस या ठिकाणची पथकं घटनास्थळी दाखल झाली. या ठिकाणी आग नियंत्रणात आणायला सकाळ उजाडली होती.
https://www.facebook.com/109399567404448/posts/544645640546503/