□ भर पावसातही हजारो भक्तगणांचा सहभाग
सोलापूर : काशीपीठाचे जगद्गुरु व बृहन्मठ होटगी या मठाचे मठाधिपती डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य यांची भक्तीपूर्ण वातावरणात अड्डपालखी काढण्यात आली. या सोहळ्यात महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील तसेच शहर जिल्ह्यातील हजारो भक्तगण सहभागी झाले होते. Addapalakhi ceremony of the new Kashi Jagadguru in a devotional atmosphere
वाराणसी येथील काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी बृहन्मठ होटगी या मठाचे मठाधिपती डॉ. मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य यांची काशी पीठाचे ८७ वे जगदगुरु म्हणून १३ में रोजी काशी येथील जंगमवाडी मठात श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी उज्जैन जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पट्टाभिषेक केला होता.
आपले मठाधीश जगदगुरु झाले याचा आनंद साजरा करावा आणि नुतन जगद्गुरु यांचे दर्शन व्हावे याउद्देशाने ही अड्डपालखी काढण्यात आल्याचे होटगी मठाचे संचालक शिवानंद पाटील यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी ५ वाजता नुतन जगदगुरु डॉ. मल्लिकार्जून विश्वाराध्य जगदगुरू यांची अड्डपालकी बाळीवेस येथील मल्लिकार्जून मंदिर येथून निघाली. त्यानंतर चाटी गल्ली, मंगळवारपेठ, मधला मारुती, माणिकचौक, पंचकट्टा यामार्गे ती ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर येथे समाप्त करण्यात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/544732437204490/
यावेळी उपस्थित भक्तांनी दिलेल्या जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय …… जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की जय अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला. मिरवणूकीच्या प्रारंभी जलकुंभ घेतलेल्या १०१ सुवासिनी होत्या. त्यामागे बँड पथक होते.
खास आंध्र प्रदेश वरून पुरवंत आपली कलाप्रकारांचे सादरीकरण करत होते. त्याचा मार्गावरील भक्तगण दर्शन घेऊन धन्य होत होते. पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना देखील मिरवणुकीतील भक्त आणि मार्गावरील भक्त यांच्या संख्या कमी झाली नाही.
यांची यावेळी मंद्रपचे रेणूक शिवाचार्य, मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य, श्रीकंठ शिवाचार्य, होटगी मठाचे उत्तराधिकारी चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, प्रकाश वाले, नरेंद्र गंभीरे, तम्मा मसरे, राजशेखर हिरेहब्बू, केदारनाथ उंबर्जे, अमर पाटील, सचिव शांतय्या स्वामी, सिद्धय्या स्वामी हिरेमठ, बसवराज शास्त्री – हिरेमठ, शिवयोगी शास्त्री होळीमठ, प्रभुराज विभुते, दिलीप दुलंगे, राजेंद्र गंगदे – आदी उपस्थित होते.