□ शेतकरी विरोधी महाविकास आघाडीच्या सरकारचे करणार विसर्जन
□ रयतेचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
माढा – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार बोलायला तयार नाही. उजनीच्या पाण्याचे नियोजन केवळ दुष्काळी बॅकवॉटर व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मिळेल, अशी योजना आहे. मात्र षडयंत्र करून रचून उजनीचे पाच टीएमसी पाणी पळवले, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात केली. Jagar Shetkariyan Akrosh Maharashtra Sanwad Yatra Conspiracy Conspiracy Five TMC of Ujjain snatched water; The government cares more about bar owners than farmers
रयत क्रांती संघटना आयोजित जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा संवाद यात्रा समारोपाप्रसंगी टेंभुर्णी येथे शुक्रवारी (ता.20) ते बोलत होते. मंचावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आ. राहूल कुल, आ. राजाभाऊ राऊत, आ. समाधान आवताडे, आ. राम सातपुते, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे धैर्यशील मोहिते – पाटील, शशिकांत देशमुख, श्रीकांत पाटील, राज्य समन्वयक प्रा सुहास पाटील, सागर खोत, दिपक भोसले, तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, शंकरराव वाघमारे , शिवाजी कांबळे योगेश पाटील दत्तात्रय मोरे यांची उपस्थिती होती.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सर्वसामान्यांच्या व शेतकऱ्याच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज असल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान शेतकऱ्यांच्या कष्टाचे प्रतीक असणारा नांगर भेट देत सदाभाऊ खोत यांनी सन्मान केला.
मान्यवरांचे स्वागत प्रा सुहास पाटील व योगेश बोबडे यांनी केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील सहकारी साखर कारखाने षडयंत्र करून बंद पाडायचे बुडवायचे आणि स्वतः विकत घ्यायचे आणि मग शेतकऱ्यांना पिळून काढण्याचा कार्यक्रम या महाविकास आघाडी सरकारचा असून आमदार सदाभाऊ खोत यांनी सुरू केलेल्या शेतकरी जागर यात्रेचा समारोप नसून खऱ्या अर्थाने आंदोलनाची मशाल पेटवली आहे. आता राज्यातील शेतकरी विरोधी सरकारचे विसर्जन केल्याशिवाय आणि राज्यात रयतेचे राज्य प्रस्थापित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज्य सरकारवर चौफेर टिका करत शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे देणे घेणे नाही.गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री व प्रवक्ते त्यांचे सहकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ती बोलत नाहीत. पिकेल ते विकेल असे म्हणा-यांनी अतिरिक्त ऊसाविषयी नियोजन न केल्याने शेतात ऊस जळला. नव्हे तर शेतकऱ्यांची ऊस पेटवून आत्महत्या केल्या तरीही यांना घाम फुटत नाही. पिकेल ते सडेल जळेल अशी म्हणण्याची पाळी आली. आणि ऊस शेती ही आळशी शेतकऱ्यांची शेती आहे, असे म्हणून जाणते राजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याची घणाघाती टीका केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/545067217171012/
शेतक-यांपेक्षा बारमालकांची काळजी या सरकारला जास्त आहे. म्हणूनच कोरोना काळात 50 टक्के लायसन फी कमी करून विदेशी दारूवरील 50 टक्के टॅक्स कमी केला. राज्यात आलेल्या चार चार नैसर्गिक आपत्तीच्या काळात 10 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करून फक्त 3 हजार कोटी शेतक-यांना दिले. नियमित कर्जदारांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर करून जाचक नियम व अटी लागल्याने तेही मिळत नाहीत.
पिक विम्याच्या बाबतीत मागील वर्षी 8 हजार कोटी रूपये विभाग कंपन्यांना मिळाले मात्र शेतकऱ्यांना एक दमडीही नाही मिळाली.
भाजप सरकारने सुरू केलेल्या ठिबक सिंचन योजनेचे 90 टक्के अनुदान बंद केले. मागेल त्याला शेततळे ही योजना बंद केली. जागतिक बँकेकडून 4 हजार कोटी मिळवले स्मार्ट योजनेचे नाव बदलून बाळासाहेब ठाकरे शेतकरी योजना केले मात्र अनुदान नसल्याचा आरोप केला.
कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ असे घोषवाक्य दिले. त्याचा अर्थ या सरकारने तंतोतंत पाळत आपलीच घरे भरली आणि शेतकरी व जनतेच्या तोंडाला पाने पुसली. उजनीच्या पाणी बारामती व इंदापूरला पळवण्याच्या विषयावर बोलताना यांची तहानच भागत नाही .दुसऱ्यांच्या हक्कांवर दरोडा टाकायची सवय जुनीच असल्याची बोचरी टीका पवारांवर करत राज्यात सामंतशाही आणण्याचे प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले.
जो पाणी से नहाता है
वो कपडे बदलता है
वो लिबास बदलता है
लेकीन जो पसीनेसे नहाता है
वो इतिहास बदलता है
असे सांगत आम्ही इतिहास बदलून लवकरच रयतेचे राज्य प्रस्थापित करू, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी संयोजक तथा माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या ग्रामीण ढंगात बारामतीकरावर तोफेचे गोळे डागले. उजनीच्या पाण्यावर दरोडा टाकाल तर याद राखा असे म्हणीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना कंसमामाची उपमा देऊन देवेंद्र रूपी कृष्णाच्या साथीने तुमचे मनसुबे गाडल्याशिवाय राहणार नसल्याचे निक्षून सांगितले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजप हा जातीयवादी पक्ष नसून सर्वसामान्यांना सोबत घेत सन्मान देणारा पक्ष आहे. नरेंद्र मोदी हे युगपुरूष आहेत. शरद पवार तुम्ही ज्येष्ठ आहात पण श्रेष्ठ नाही अशी टिका करीत राज्यातील जनतेचा विश्वासघात करीत निर्माण झालेले हे महाविकास आघाडीचे भ्रष्ट सरकार उलथून लावल्याशिवाय शांत बसणार नाही असा एल्गार केला.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती देत न्यायालयीन यंत्रणेचा दुरूपयोग करून कितीही गुन्हे दाखल केले तरी जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही असे ठामपणे सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/544996327178101/