Monday, January 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Brahmin organizations शरद पवार आज ब्राह्मण संस्थांशी करणार चर्चा; पण ब्राम्हण महासंघाने निमंत्रण धुडकावले

यावर फडणवीस यांनी पंढरपुरात दिली प्रतिक्रिया

Surajya Digital by Surajya Digital
May 21, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
Brahmin organizations शरद पवार आज ब्राह्मण संस्थांशी करणार चर्चा; पण ब्राम्हण महासंघाने निमंत्रण धुडकावले
0
SHARES
61
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

□ यावर फडणवीस यांनी पंढरपुरात दिली प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्राह्मण संस्थांशी चर्चा करणार आहेत. त्यासाठी त्यांनी विविध संस्थांना भेटायला बोलावले आहे. पण या बैठकीस जाण्यास ब्राह्मण महासंघाने नकार दिला आहे. गेल्या 40 वर्षात पहिल्यांदा पवारांनी अशा प्रकारची बैठक बोलावली आहे. आज ही बैठक आहे. ब्राह्मण समाजातील काही घटक त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावरून त्यांच्यावर टीकाही होत आहे. Sharad Pawar to discuss with Brahmin organizations today; But the Brahmin Federation turned down the invitation to Pune

शनिवारी ही बैठक पुण्यात पार पडणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीने दिली आहे. पवार ब्राह्मणविरोधी असल्याची मते सोशल मीडियावर व्यक्त केली जातात. याच पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका आणि ब्राह्मण संघटनांचे म्हणणे यावर सखोल चर्चा होईल.

राष्ट्रवादीचे नेते वारंवार ब्राह्मणविरोधी वक्तव्ये करतात. इस्लामपूरच्या सभेत अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची चेष्टा केली. तर कोल्हापूरच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाला टार्गेट करताना पूजाविधी करणे हा ब्राह्मण समाजाचा धंदा आहे, असे वक्तव्य केले.

शरद पवारांनी देखील एका सभेत शाहू महाराज – ज्योतिषाचे उदाहरण दिले. एकंदरीतच अशा वक्तव्यातून राष्ट्रवादीचे ब्राह्मण समजाबाबतचे मत दिसून येते. पवारांनी ब्राह्मण समाजाबाबत प्रथम त्यांची भूमिका स्पष्ट करावी, नंतरच आम्ही चर्चेला जाऊ असे म्हणत ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी शरद पवार यांनी दिलेल्या चर्चेचे निमंत्रण धुडकावले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

शरद पवार यांच्यावर मागील काही महिन्यांपासून ते ब्राह्मणविरोधी असल्याची टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ बहुतेक ब्राह्मण मान्यवरांनी पवार ब्राह्मणविरोधी असल्याची टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे.

शरद पवार यांच्या या बैठकीला जायचे की नाही यावर ब्राह्मण संघटनांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. परशुराम सेवा संघ, ब्राह्मण महासंघ या संघटनांनी या बैठकीला जाणार नसल्याचे सांगत चर्चेवर बहिष्कार घातला आहे. ब्राह्मण महासंघाचा कोणताही पदाधिकारी या बैठकीला जाणार नसल्याचे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी स्पष्ट केले आहे. तर अन्य संघटना या बैठकीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात प्रतिक्रिया दिली आहे. ”पवार साहेबांना ब्राह्मण समाजाची आठवण झाली बरं झालं. आनंद आहे इतक्या वर्षांनी पवार साहेबांना ब्राम्हणांची आठवण आली आहे. सर्वांना बैठक बोलवण्याचा अधिकार आहे व कोणत्याही समाजाची बैठक बोलवण्याचा अधिकार आहे.” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

 

 

Tags: #SharadPawar #discuss #Brahmin #organizations #today #But #Brahmin #Federation #turned #down #invitation #Pune#शरदपवार #आज #ब्राह्मण #संस्था #चर्चा #ब्राम्हण #महासंघ #निमंत्रण #धुडकावले
Previous Post

Bjp Sanwad Yatra षडयंत्र रचून उजनीचे पाच टीएमसी पाणी पळवले; सरकारला शेतक-यांपेक्षा बारमालकांची काळजी

Next Post

Monkeypox परदेशात मंकीपॉक्सचा धोका, विमानतळावर आरोग्य अधिकारी सतर्क, अलर्ट जारी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Monkeypox  परदेशात मंकीपॉक्सचा धोका, विमानतळावर आरोग्य अधिकारी सतर्क, अलर्ट जारी

Monkeypox परदेशात मंकीपॉक्सचा धोका, विमानतळावर आरोग्य अधिकारी सतर्क, अलर्ट जारी

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697