सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी जवळ एसटी बसचा अपघात झाला आहे. बसचे स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली आहे. ही घटना आज शुक्रवारी (ता. 20) सकाळी दहाच्या सुमारास घडली. यावेळी बसची गती कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. ST bus overturned due to broken steering rod, torrential rain in Solapur
या बसमध्ये साधारणपणे ५० ते ६० प्रवाशी प्रवास करत होते. स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बबलाद परमानंद तांड्यावरून अक्कलकोटकडे निघालेली एसटी बस कलप्पावाडी गावापासून अवघ्या अर्धा किलो मिलीमीटर अंतरावर रस्त्यावरच्या खड्ड्यात बस आदळल्याने अचानकपणे बसची स्टेरिंग रॉड तुटल्याने मल्लिकार्जुन बंडगर यांच्या शेतात बस पलटी झाली.
चालक जाधव यांच्या प्रसंगासवधानमुळे सहा प्रवाशी किरकोळ जखमी झाली आहेत. .स्थानिक लोकांच्या मदतीने बाकीच्या सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहेत. या दरम्यान अपघात झाल्याचे कळताच कलप्पावाडी व परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले.
सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही. मात्र काही जण जखमी झाले आहेत. काही जणांना मुका मार बसला आहे. त्यानंतर तातडीने त्या ठिकाणी एम्ब्युलन्स बोलावण्यात आली जखमींना तातडीने गावातच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
तात्काळ रुग्णवाहिका बोलावून पुढील उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. यावेळी मारुती सोनकर, जयकुमार जानकर संजय पांढरे, शंकर जानकर मनोहर देवकते, सलीम मासुलदार यांच्यासह गावकारी मंडळ मदतीसाठी धावून आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/544581257219608/
□ सोलापुरात काल मुसळधार पाऊस
शहरात काल गुरुवारी (ता. 19) पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. सायंकाळपर्यंत ७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एकाच पावसात शहर पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. काल सायंकाळी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला. मोहोळ, नरखेड, पेनूर, पंढरपूर शहर व परिसर, पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर), पिंपळनेर (ता. माढा), मंद्रूप, मंगळवेढा शहर व ग्रामीण परिसर आदी ठिकाणी पाऊस पडला. आज ही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.
शहरात सकाळपासून मॉन्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कालपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी ११.३० च्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यानंतर दुपारी, सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह चांगला पाऊस झाला. सायंकाळपर्यंत शहरात ७ मिलिमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद झालीय.
https://www.facebook.com/109399567404448/posts/544363057241428/