पुणे : पुणे जिल्ह्यात 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चासकमान आणि भाटघर धरणात घडलेल्या या घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. भाटघर धरणात बुडून पाच विवाहित महिलांचा मृत्यू झाला तर एका मुलीला वाचविण्यात यश आले. Sad! Nine people, including five married women, drowned in Pune district
रितीन डी. डी, नव्या भोसले, परीक्षित आगरवाल व तनिष्का देसाई या विद्यार्थ्यांचा चासकमान धरणात बुडून मृत्यू झाला. तर खुशबू संतोष राजपूत, मनिषा लखन राजपूत, चांदणी शक्ती राजपूत, पूनम संदीप राजपूत, मोनिका रोहित चव्हाण यांचा भाटघर धरणात बुडून मृत्यू झाला. भाटघर धरणात पाच विवाहित महिलांचा बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, या सर्व महिला या कंजर भट समाजाच्या असून एक मुलगी सुदैवाने बचावली आहे.
भाटघर धरणाच्या न-हे गावच्या तीरावर गुरुवारी (ता.१९) सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नरे गावातील कातकरी समाजाच्या तरुणाने तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. ही दुर्घटना काल गुरूवारी (दि.19) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, राजगड चे पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. सह्याद्री सर्च अंड रेस्क्यू फोर्स च्या जवानांनी शोधकार्य सुरू केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/544468773897523/
घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबू लंकेश रजपूत (वय 19, रा बावधन), मनीषा लखन रजपूत (वय 20), चांदनी शक्ती रजपूत (वय 21), पूनम संदीप रजपूत (वय 22, तिघीही रा. संतोषनगर, हडपसर पुणे) मोनिका रोहित चव्हाण (वय 23, रा नऱ्हे, पुणे), अशी मृत्यू महिलांची नावे आहेत. यातील खूशबू आणि चांदनी यांचे मृतदेह अजून मिळालेली नाहीत, उर्वरित तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत.
धरणात एकूण सहाजण बुडाले होते. त्यातील एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. भाटघर धरणालगतच्या नऱ्हे गावच्या हद्दीत सायंकाळी दुर्घटना घडली. नऱ्हे गावातील कातकरी समाजाच्या तरुणाने तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. घटनास्थळी राजगडचे पोलीस दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.
¤ मुसळधार पावसाचा अंदाज
#rain #rainfall #अंदाज #surajyadigital #पाऊस #सुराज्यडिजिटल
》 देशातील अनेक राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातही अनेक शहरात गेल्या दोन दिवसात पाऊस झाला आहे. तर आता भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. केरळच्या 14 पैकी 12 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच तामिळनाडू आणि आजूबाजूच्या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/544089737268760/