नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एलपीजी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यानुसार आज (1 जून) जाहीर झालेल्या किंमतीनुसार 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. याआधी मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती. Comfort! Big reduction in gas cylinder price in 10 days
व्यवसायिक सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोग्रॅम व्यवसायिक सिलेंडरचे दर प्रति सिलेंडर 135 रुपयांनी कमी करण्यात आले आहे. नुकत्याच मे महिन्याच्या सुरुवातीलाच सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी ओएमसीएसने 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ केली होती. त्यावेळी प्रति सिलेंडर १०४ रुपयांची वाढ करण्यात आली होती. या दरवाढीमुळे हॉटेलमधील जेवण देखील महाग होण्याची शक्यता दर्शवली जात होती.
मात्र व्यवसायिक सिलेंडरच्या दरात मोठी कपात झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता राजधानी दिल्लीमध्ये व्यवसायिक सिलेंडरचा दर हा 2,219 रुपये एवढा झाला आहे. आधी याच व्यवसायिक सिलेंडरसाठी 2,354 एवढी किंमत मोजावी लागत होती. गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस व व्यवसायिक सिलेंडरच्या दरात वाढ सुरू होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आजपासून हा सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. सरकारी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १३५ रुपयांची कपात केली असून, त्यानंतर इंडेन सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त होणार असून दिल्लीत २२१९ रुपये प्रति सिलिंडर दराने उपलब्ध होणार आहे.
घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला नाही घरगुती ग्राहकांना म्हणजेच 14.2 किलोग्रॅम सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना आज या सिलिंडरवर कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, आणि तो 19 मे पर्यंत सारखाच आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिक सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. आता व्यवसायिक सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहे. त्यानुसार दिल्लीतील नागरिकांना 2,354 ऐवजी 2,219 रुपये द्यावे लागणार, कोलकात्यात आता 2,454 ऐवजी 2,322 रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबईतील नागरिकांना 2,306 ऐवजी 2171.50 रुपये द्यावे लागणार आहेत आणि चेन्नईमध्ये 2507 ऐवजी 2373 रुपयांना विकला जाईल. एलपीजी गॅस सिलेंडर दर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पहिल्या तारखेला बदलले जातात. व्यवसायिक सिलेंडरच्या दरात झालेल्या कपातीमुळे सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
मागील महिन्यात 1 मे ला यात सुमारे 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मार्चमध्ये दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत केवळ 2,012 रुपये होती. 1 एप्रिलला याचे दर 2,253 वर गेले व आता मे महिन्यात हे दर 2,355 रुपयांवर पोहोचले.