Saturday, January 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Solapur Municipal Election दिग्गजांच्या प्रभागात ‘नारी’ ठरणार ‘भारी’; काही प्रभागात जुने जाणार, नवे येणार

'Women' will be 'heavy' in the veterans' ward; In some constituencies, old ones will come and new ones will come

Surajya Digital by Surajya Digital
June 1, 2022
in Hot News, सोलापूर
0
Solapur Municipal Election दिग्गजांच्या प्रभागात ‘नारी’ ठरणार ‘भारी’; काही प्रभागात जुने जाणार, नवे येणार
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी महिला आरक्षण सोडत निघाल्यानंतर इच्छुकांना प्रभाग आणि आरक्षणामुळे निवडणुक कशी जाणार हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. आपल्या सोयीच्या प्रभागात तीन सदस्यांपैकी दोन महिला आरक्षण पडल्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी धोक्यात आल्याने त्यांना आता घरातील महिलांना पक्षाकडून संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ‘Women’ will be ‘heavy’ in the veterans’ ward; In some constituencies, old ones will come and new ones will come, Solapur Municipal Election

महापालिका निवडणुकीसाठी एससी, एसटी आणि सर्वसाधारण महिला आरक्षणाची प्रक्रिया पार असून  यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसींना वगळून होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यंदा महापालिकेच्या सभागृहात किमान 57 महिलांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे. यंदा महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पध्दत असून नवीन प्रभागरचनेनुसार यावेळी 38 प्रभाग असून एकूण 113 नगरसेवक आहेत.

 

एकूण 38 प्रभागांपैकी 16 प्रभाग एससी तर 2 प्रभाग एसटी प्रवर्गासाठी राखीव असून 95 प्रभाग सर्वसाधारण आहेत. 50 टक्के महिला आरक्षणानुसार एससी 16 पैकी 8, एसटी दोन पैकी एक आणि सर्वसाधारण 95 पैकी 48 असे एकूण 57 जागांवर महिला आरक्षण आहे. गत महापालिकेत 102 नगरसेवकांपैकी 52 महिला नगरसेविका होत्या. यावेळी देखील महिलांची संख्या अधीक असण्याची शक्यता आहे. कारण यंदा असलेल्या एकूण 113 नगरसेवकांपैकी 57 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर इतरही सर्वसाधारण जागांवर महिला निवडणुकीसाठी उभे राहू शकतात. त्यामुळे ज्या सोयीच्या प्रभागातील जागेवर महिला आरक्षणामुळे उमेदवारी धोक्यात आलेल्यांकडून घरातील महिलांना संधीसाठी पक्षाला साकडे घालण्याची वेळ येणार आहे.

प्रभागरचनेतील बदल आणि महिला आरक्षणामुळे अनेक विद्यमानांसह माजी नगरसेवकांनाही आपल्या सोयीच्या प्रभागात संधी मिळणार नसल्याची स्थिती ओढावली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

त्यामुळे अनेक दिग्गजांची पंचायत झाली आहे. प्रामुख्याने पाहिल्यास काही माजी महापौर, माजी उपमहापौर यांच्यासह काही माजी पदाधिकारी यांची उमेदवारी देखील धोक्यात आलेली आहेत. मनोहर सपाटे, दिलीप कोल्हे, पुरुषोत्तम बरडे, पद्माकर काळे, शोभा बनशेट्टी, अमर पुदाले, सुरेश पाटील, संजय कोळी, गणेश पुजारी, आनंद चंदनशिवे, गणेश वानकर, मनोज शेजवाल, नागेश भोगडे, राजकुमार हंचाटे, रियाज खरादी, चेतन नरोटे, विनोद भोसले, फिरदोस पटेल, श्रीदेवी फुलारी, तौफिक शेख, किसनभाऊ जाधव, नागेश गायकवाड, लक्ष्मण जाधव, अश्‍विनी चव्हाण, वैष्णवी करगुळे  आदी आजी-माजी नगसेवकांपैकी अनेकजण खुशीत तर अनेकांची चिंता वाढली आहे.

□ महाआघाडी झाल्यास उमेदवारीवरून बंडखोरीचा धोका

राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने भाजपाला महापालिकेतील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सोलापुरातही महाविकास आघाडी करण्याचे ठरवले तर तीन पक्षांना 113 जागांपैकी वाटणीत प्रत्येकी 35 जागा येवू शकतात. परंतु गत महापालिकेत कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक होते. यावरूनही जागा वाटपात तिढा येवू शकतो. तसेच महाआघाडी झाल्यास तीनही पक्षातील अनेक निष्ठावंत इच्छुकांना निवडणुक लढविण्यावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळालेले अनेकजण बंडखोरीच्या तयारीत असणार आहेत. त्यामुळे पाडापाडीचे राजकारण रंगणार आहे. तर याउलट भाजप 113 जागा लढवून आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

□ 20 प्रभागांमध्ये प्रत्येकी  दोन जागा महिलांसाठी आरक्षित

एकूण 38 प्रभागांपैकी तब्बल 20 प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. एक जागा सर्वसाधारण आहे. येथे ‘महिला राज’ आहे. या वीस प्रभागांमध्ये मात्र अनेक नेत्यांना धक्का बसला. काही जणांना यामुळे आपल्या कुटुंबातील महिला सदस्यांना संधी द्यावी लागणार आहे.

 

● संपूर्ण आरक्षण सोडतीचे व्हिडीओ चित्रीकरण

महापालिका निवडणुकीसाठी होणाऱ्या आरक्षण सोडत पारदर्शक ड्रममधून दिव्यांग (अंध) विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठीद्वारे काढण्यात आले. याचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. तसेच स्थानिक केबल, फेसबुकवर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. आरक्षण सोडत कोणत्या प्रभागातून कशाप्रकारे काढण्यात येणार याची सविस्तर माहिती दर्शविणारे पत्रक उपस्थितांना सोडती पूर्वी देण्यात आले.तसेच महापालिकेच्या वेबसाइटवर देखील प्रसिद्ध करण्यात आले.

□ सूचना हरकती दाखल करण्यासाठी
१ ते ६ जून पर्यंतचा कालावधी

आरक्षण सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप स्थानिक वर्तमानपत्र महापालिका वेबसाईट तसेच विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ८ येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावर सूचना हरकती दाखल करण्यासाठी दिनांक १ ते ६ जून पर्यंतचा कालावधी ठेवण्यात आला आहे. या सूचना व हरकती महापालिकेच्या कोटणीस हॉल येथे असलेल्या निवडणूक कार्यालयात व विभागीय कार्यालयांमध्ये दाखल करून घेण्यात येणार आहेत.शेवटी १३ जून 2022 रोजी अंतिम आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे, असे आयुक्त  पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले.

 

Tags: #Solapur #Municipal #Election#Women #willbe #heavy #veterans #ward #constituencies #oldones #willcome #newones#सोलापूर #महापालिका #निवडणूक #कोठे #सेना #राष्ट्रवादी #नेतृत्व
Previous Post

एटीएम कार्ड वापरून मुलांनी घातला बापालाच २ लाखाचा गंडा; अपघातात करमाळ्यातील दोन ठार

Next Post

gas cylinder price दिलासा ! 10 दिवसात गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
gas cylinder price दिलासा ! 10 दिवसात गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात

gas cylinder price दिलासा ! 10 दिवसात गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697