मोहोळ : पैशासाठी अनेकजण अनेक फंडे वापरून गंडा घालत असतो. आपण हे अनेकदा वाचलं आणि पाहिले असेल. पण मोहोळमध्ये पोटच्या मुलानेच बापाला गंडा घातला आहे. तोही दोन लाखाचा. वाचा तो कसा… Children use ATM card to rob father of Rs 2 lakh; Two killed in car accident
एटीएम कार्ड वापरून गोटेवाडी येथील शेतकऱ्याला त्याच्या दोन मुलांनीच दोन लाख रुपयाला गंडा घातल्याची घटना घडली. शेतकऱ्याने मोहोळ पोलिस ठाण्यात दोन्ही मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील जगन्नाथ भुजंगा कोकरे यांनी मोहोळ शहरातील भारतीय स्टेट बँकेमध्ये स्वतःचे खाते उघडले होते. त्या खात्यावरती २ लाखापेक्षा जास्त रक्कम शिल्लक होती. त्या खात्याचे त्यांनी एटीएम कार्ड काढले होते, परंतु त्याचा वापर केला नव्हता.
आज मंगळवारी ( दि. ३१ मे) सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गेले व त्यांनी २ लाख रुपये काढण्यासाठी विड्रॉल भरला. मात्र त्यांच्या खात्यामध्ये केवळ ६४७ रुपये शिल्लक असल्याचे समजले. त्यांनी या संदर्भात तात्काळ बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांच्या एटीएमच्या माध्यमातून २४ मे पासून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेळोवेळी २ लाख रुपये काढून घेतल्याचे सांगितले. बाप हे ऐकून हादरून गेला.
शेतकरी जगन्नाथ कोकरे यांना दोन्ही मुले सागर कोकरे व सचिन कोकरे यांनी संगणमत करून माहित न होऊ देता परस्पर स्वतःच्या आर्थिक फायदा करता सेविंग खात्यांमधून दोन लाख रुपये एटीएम मधून चोरून घेतल्याचे उघड झाले. या प्रकरणी सागर कोकरे व सचिन कोकरे या दोन्ही मुलांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे करत आहेत.
□ टेंभुर्णी महामार्गावर एसटी – दुचाकीचा अपघात, करमाळ्यातील दोन ठार
सोलापूर : करमाळा तालुक्यातील टेंभुर्णी राज्य महामार्गावर कंदरजवळ एसटी बस व दुचाकीमध्ये अपघात झाला आहे. यामध्ये दोघे जण मयत झाले आहेत. दुचाकीवरील दोघेजण जागीच मयत झाले. राजेंद्र महादेव डोके (वय २०) व रोहन अनिल पाडोळे (वय १९ दोघे रा. कंदर ता. करमाळा) अशी त्यांची नावे आहेत.
करमाळा टेंभुर्णी महामार्गावर कल्याणवरून (करमाळ्याकडून) पंढरपूरला एसटी बस जात होती. तर क्रमांक एम एच १२ ई यू ३००४ या दुचाकीवरून कंदरहून जेऊर कडे दोघे कामानिमित्त जात होती. दरम्यान कंदर जवळील पेट्रोलपंपाजवळ आल्यानंतर समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. एमएच१३ सीयू ७३८६ या बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील दोघे ही खाली पडून गंभीर जखमी झाले. दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने बस चालक च्या विरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/551982083146192/
राजेंद्र हा सध्या बीए च्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या पाठीमागे आजी, आई-वडील, भाऊ, दोघे ही मुले शांत स्वभावाची होती. त्यांच्या जाण्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रोहन हा मजुरीचे काम करत होता. आई-वडील, २ बहीण, चुलते असा परिवार आहे.
□ निंभोरे येथे विष पिऊन आत्महत्या
सोलापूर : निंभोरे (ता.करमाळा) येथे राहणाऱ्या नवनाथ महादेव मारकड (वय ५५) या विवाहित इसमाने विष पिऊन आत्महत्या केली. रविवारी (ता. 29) सकाळच्या सुमारास त्याने राहत्या घरात विष प्राशन केले होते. त्याला करमाळा येथे प्राथमिक उपचार करून वैशाली मारकड (पत्नी) यांनी त्याला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी पहाटे मरण पावला. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही.
□ नईजिंदगी परिसरात गळफास घेतलेल्या इसमाचा मृत्यू
सोलापूर : सिद्धेश्वरनगर भाग १ (नई जिंदगी) येथे राहणाऱ्या मुबीन करीम शेख (वय ३७) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. २६ मे रोजी पहाटेच्या सुमारास याने राहत्या घरात दारूच्या नशेत ओढणीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून बेशुध्दावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तो आज सोमवारी सकाळी मरण पावला. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/551989009812166/