सोलापूर : शहराचे लक्ष लागलेल्या महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज मंगळवारी महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. याअंतर्गत सर्वसाधारण महिलांसाठी 48, अनुसूचित जातीसाठी 8 तर अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आरक्षित असणार आहे. Solapur Municipal Election: 57 seats reserved for women, read more
महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाली असून त्यात अनुसूचित जाती-जमाती आणि महिला आरक्षण काढण्याची प्रक्रिया आज दुपारी १ च्या सुमारास रंगभवन येथे सुरु झाली होती. अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते हे आरक्षण काढण्यात आले. आज आरक्षणाचा घाला नक्की कोणाच्या पथ्यावर आणि विरोधात पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आगामी राजकारणाची, अनेकांच्या राजकीय भवितव्याची कसोटी लागली होती. पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आरक्षण काढताना उपस्थित होते. रंगभवन सभागृहही विविध राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांनी भरलं होते. दमाणी अंध शाळेचे दिव्यांग विद्यार्थी दर्शना लेंडवे, कार्तिकी खांडेकर, अस्मिता बनसोडे, संकेत रुपनुरे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महापालिका प्रशासनाच्यावतीने छत्रपती रंगभवन येथे दुपारी एक वाजता महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अनूसूचित जाती,अनुसूचित जमाती व सर्वसाधारण अशा तीन प्रकारच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महापालिकेचे एकूण ११३ प्रभाग आहे. यात १६ जागा अनुसुचित जाती, त्यातही ८ महिलांसाठी तर २ अनुसुचित जमातीसाठी, यात १ महिलेसाठी आणि सर्वसाधारण ९५ मधील ४८ जागा महिलांसाठी राखीव असतील. महिलांसाठी एकूण राखीव जागांची संख्या ५७ इतकी आहे.
आज सर्वप्रथम अनुसुचित जमाती (एस.टी.) साठी २४ ब आणि ३५ अ हे प्रभाग निश्चित झाले. यातील ३५ अ ही जागा चिठ्ठीद्वारे अनुसुचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षीत झाली. यानंतर अनुसूचित जाती साठी १६ प्रभाग निश्चित करण्यात आले. यातून आता ८ आरक्षण जागांवर महिला काढण्याची प्रक्रिया पार पडेल. यानंतर उर्वरित ९५ जागांपैकी ४८ जागांवर सर्वसाधारण गटातील महिलांच आरक्षण निघणार आहे. येत्या काही वेळात ही प्रक्रिया पूर्ण होवून प्रसिध्दीकरण होईल.
उद्या बुधवारी (ता. 1) आरक्षणाची यादी नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात येईल तर १ ते ६ जूनपर्यंत आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याची मुदत असणार आहे. तरी हरकती व सूचना या संबंधित विभागामध्ये सादर कराव्यात, असे आयुक्तांनी सांगितले.
● 57 जागा महिलांसाठी राखीव
113 सदस्यसंख्या असलेल्या सोलापूर महापालिकेत एकूण 57 जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण असे तीन प्रकारचे आरक्षण आहे. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी प्रभाग क्र. 5अ, 9अ, 10 अ, 23 अ, 24 अ, 28अ, 33 अ, 36 अ या 8 जागा तर अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी 35 अ ही एकच जागा राखीव असणार आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी 48 जागा राखीव राहणार असून, यामध्ये प्रभाग क्र., 1ब, 2अ, 2 ब, 3 अ,4 अ, 4 ब, 5 ब, 6 अ, 6 ब, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 अ, 12 अ, 13 अ, 13 ब, 14 अ, 14 ब, 15 अ, 15 ब, 16 अ, 17 अ, 17 ब, 18 अ, 19 अ, 19 ब, 20 अ, 21 ब, 22 ब, 23 ब, 25 अ, 25 ब, 26 ब, 27 ब, 28 ब, 29 अ, 30 अ , 31 अ, 31 ब, 32 अ, 32 ब, 33 ब, 34 अ, 35 ब, 36 ब, 37 अ, 38 ब चा समावेश आहे.
● असे आहे प्रभागनिहाय महिला आरक्षण