सोलापूर : एक हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता ५०० रुपये स्वीकारले असताना कृषी विस्तार अधिकारी संदिप रामदास गावडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच रंगेहात पकडले. Two acts of bribery; Agriculture Extension Officer and Talatha arrested
यातील तक्रारदार यांनी त्यांचे वडीलांचे नावे जिल्हा परीषद सेस अंतर्गत डी बी टी योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशिन अनुदान मिळणेकरीता कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग येथे अर्ज सादर केला असुन सदर अर्जाचा पाठपुरावा यातील तक्रारदार करीत असताना आलोसे संदिप रामदास गावडे, कृषी विस्तार अधिकारी, कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग यांनी सदर अर्जामधील बँक अकाउंट नंबर चुकला असल्याचे सांगुन सदर अकाउंट नंबर दुरुस्त करण्याकरीता १ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती ५०० रुपये स्विकारण्याचे मान्य करुन सदर लाच रक्कम कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग, कार्यालयात स्वतः स्विकारलेवरुन त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
● माढ्यातील तलाठ्यास अटक
शेतातील महोगणी झाडांची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी चार हजाराची लाच घेताना मोडनिंबच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
महेशकुमार मनोहर राऊत (तलाठी, रा- मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर, रा. मेडशिंगी, ता. सांगोला) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांची मौजे मोडनिंब येथे क्र. ५२२ वर ५८ आर बागायत शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीपैकी ४० आर शेतजमीनीवर महोगनी झाडाची लागवड केली असून, त्याबाबत सात बारा उताऱ्यावर पिकपाण्याची लावण्यासाठी चार हजाराची लाच घेताना मोडनिंबच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
गावकामगार तलाठी महेशकुमार राऊत यांनी तक्रारदारांच्याकडे ४०००/ रुपये लाचेची मागणी करून तो स्वतः स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आरोपी याला चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/553310906346643/
● मार्कंडेय सहकारी रूग्णालयाची निवडणूक होणार जाहीर
#Markandey #मार्कंडेय #solapur #सोलापूर #निवडणूक #election
सोलापूर : सोलापुरातील महत्वाच्या रूग्णालयामध्ये श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे नाव घेतले जाते. या रूग्णालयाची निवडणूक लागणार हे पक्के झाले असले तरी निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याबाबत शहरवासियांना उत्सुकता आहे.
पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम ११ जूननंतर जाहीर होणार असून मंगळवारी (ता. 31) जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी रुग्णालयाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. अंतिम मतदार यादीत एकूण १,७७९ मतदार आहेत.
मे महिन्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या रुग्णालयाच्या प्रारूप मतदार यादीवर एकूण २१ जणांच्या हरकती आल्या. या हरकतींवर २३ तारखेला सुनावणी झाली आणि मंगळवार, ३१ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
व्यक्तिगत सभासद यादीतून एकाचे आणि संस्थात्मक सभासद यादीतून दोघांचे असे एकूण तिघांचे नाव सभासद यादीतून जिल्हा उपनिबंधक भोळे यांनी वगळले आहे.
एकूण १८ जागांसाठी निवडणूक होणार असून, रुग्णालयावर आपली वर्णी लागावी, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. व्यक्तिगत सभासद १६०८, संस्थात्मक सभासद १२४ तसेच डॉक्टर वर्गात सभासद ४७ असे एकूण १ हजार ७७९ सभासदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
व्यक्तिगत गटातून ५ जागा, संस्थात्मक गटातून ५ जागा तसेच डॉक्टर गटातून ३ जागा, महिला गटातून २ जागा, अनुसूचित जाती गटातून १, इतर मागासवर्गीय गटातून १ तसेच भटक्या जमाती गटातून १ अशा एकूण १८ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक नियोजित आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/553234663020934/