गांधीनगर : गुजरातमधील दिग्गज नेते हार्दिक पटेल आज भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाला रामराम केला होता. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक छोटा सिपाई म्हणून काम करणार, असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रहित, प्रदेशहित, जनहित आणि समज हिताच्या भावनांसह आज नव्या अध्यायाला सुरुवात करतोय, असेही पटेल म्हणाले. Hardik Patel, who is ‘criticizing’ BJP, slams Congress
कधीकाळी भाजपवर निशाणा साधणारे काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल आज भारतीय जनात पक्षात सहभागी झाले आहेत. या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधीच हार्दिक पटेल भाजपात प्रवेश केलाय. राज्यात 20 वर्षांहून अधिक काळ भाजपची सत्ता आहे. हार्दिक यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना चांगलाच धक्का बसला आहे.
2015 मध्ये गुजरातमध्ये शासकीय नोकरी आणि शिक्षणात पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनाचा मुख्य चेहरा हार्दिक पटेल होते. संपूर्ण गुजरातमध्ये हे आंदोलन पेटले होते. या आंदोलनाचे नेतृत्व हार्दिक पटेलकडे असल्याने अनेकांच्या नजरा 28 वर्षीय हार्दिककडे वळल्या होत्या. या आंदोलनात काही ठिकाणी हिंसाचारही उफाळून आला होता. एका आंदोलनातील हिंसाचारा दरम्यान एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय सार्वजनिक मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राष्ट्रहित, प्रदेशहित, जनहित एवं समाज हित की भावनाओं के साथ आज से नए अध्याय का प्रारंभ करने जा रहा हूँ। भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र भाई मोदी जी के नेतृत्व में चल रहे राष्ट्र सेवा के भगीरथ कार्य में छोटा सा सिपाही बनकर काम करूँगा।
— Hardik Patel ( Modi Ka Parivar ) (@HardikPatel_) June 2, 2022
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या राष्ट्राप्रती असलेल्या भगीरथ कार्यात एक शिपाई बनून राष्ट्रसेवेचे काम करेन अशा शब्दांत हार्दिक पटेलांनी नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. काँग्रेसमधील निष्क्रियतेला कंटाळून पक्षाला रामराम करून बाहेर पडलेले हार्दिक पटेल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी 2017 मध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला होता. या विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेलशिवाय अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांच्या मदतीने काँग्रेस पूर्ण उत्साहात मैदानात उतरली होती. काँग्रेसला काही जागांवर निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकोर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मार्च 2019 मध्ये अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण आता भाजपची वाट धरली. स्वत:ला मोदींच्या सैन्यातील शिपाई म्हणत आगामी काळात मोदींच्या नेतृत्वात काम करेन असंदेखील पटेल म्हणाले आहेत.
दरम्यान, हार्दिक पटेल यांनी १८ मे रोजी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते आप किंवा भाजपा या दोन पक्षांमध्ये सामील होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता त्यांनीच आपण भाजपामध्ये सामील होणार आहोत अशी माहिती दिलेली होती. पटेल मागील दोन महिन्यांपासून भाजपाच्या संपर्कात होते. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत आज पटेल भाजपात प्रवेश केला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/553000539711013/