सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे एक लहान बालकास आपल्या घरासमोर खेळत होता. त्यावेळेस त्याला अचानक विषारी जातीच्या सापाने त्याच्या पायाचा चावा घेतला. यात त्या बालकाचा मृत्यू झाला. Snake bite kills child in Solapur, five arrested for chopping live arteries
शैलू नागनाथ नागणसूर (वय 8, विंचूर, ता. दक्षिण सोलापूर ) असे मृत बालकाचे नाव आहे. तत्काळ या घटनेची माहिती दक्षिण तालुक्यातील सर्पमित्र मधुकर राठोड यांना फोनवरून याची माहिती दिली. मधुकर राठोड यांनी त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाण्यासाठी सांगितले. नागणसूर यांनी त्या बालकास मंद्रूप येथील हॉस्पिटल येथे घेऊन गेले परंतु उपचारापूर्वीच त्या बालकाचा मृत्यू झाला होता.
वेळेवर उपचार न झाल्यामुळे या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण विंचूर गावावर शोककळा पसरली आहे शेलु हा आई वडीलास एकुलता एक पोरगा होता.
□ जिवंत धामिणीचे तुकडे; सहा जणांना अटक; वनविभागाची कारवाई
सोलापूर : जिवंत धामिणी पकडून त्याचे तुकडे करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या सहाजणांना वनविभागाने अटक केली. यामुळे खळबळ उडाली आहे.
२४ मे रोजी उमरगा तालुक्यातील बेटजवळगा येथील सहा मित्र शिवारात फिरत असताना त्यांना धामण जातीचा साप दिसला. त्या धामण सापास त्यांनी पकडले आणि ऊस तोडायच्या कोयत्याने जिवंतच कापून सहा तुकडे केले. यानंतरही सापाची तडफड सुरूच होती. कोयत्याने तोंडाचे तुकडे करताना धडापासून वेगळी झालेली शेपूट वळवळ करत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते. व्हिडिओमधील सर्व मुले हसत हसत सापाची अवहेलना करताना दिसत होते. अशा या माथेफिरू क्रूर कृत्याचा व्हिडिओ त्यातील एकाने आपल्या मोबाईलमध्ये काढला आणि सोशल मीडियावर टाकला. असा हा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/554465956231138/
हा व्हिडिओ सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांच्या हाती लागताच त्यांनी हा व्हिडिओ व अन्य गुप्त माहिती महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये व बसवराज होसगौडर वकिलांना पाठवला. सुनील लिमये यांनी लवकरात लवकर सर्वांना अटक करू, असा शब्द दिला. तर बसवराज वकिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला. महाराष्ट्रातील असंख्य सपप्रेमींकडून घटनेचा निषेध करत निवेदने देण्यात आली.
गुन्हा दाखल होताच उस्मानाबाद वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली पण तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. ३१ मे रोजी वनविभागाला सर्व आरोपींना पकडण्यात यश आले. या गुन्ह्याचा तपास करून बुधवारी (दि.१) श्रीकांत जयानंद जाधव (वय २१, रा. येणेगुर, ता. उमरगा). अशिष संजय माने (वय २१, रा. माडज, ता. उमरगा), महादेव दिगंबर कांबळे (वय १९, रा. नाईचाकूर, ता. उमरगा) यांच्यासह अन्य तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. तुकडे करताना धडापासून वेगळी सर्वांना अटक करू, असा शब्द दिला.
त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९७२ चे कलम ९ व ५१ अन्वये प्रथम वनगुन्हा नोंदविण्यात आला. सहाय्यक वनसंरक्षक व वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती व्ही. बी. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक टी. ए. डिगोळे, एन. बी. कोकाटे व जी. एल. दांडगे यांनी तपास करून आरोपींना अटक केली. त्यांची वनकोठडीत रवानगी करण्यात आली. साप मारणे, त्याला इजा पोहोचवणे, त्याचे प्रदर्शन करणे, जवळ बाळगणे हा वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा असून असे कोणी करत असल्याचे दिसताच वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/554361082908292/