पुणे : पुण्यात साखर परिषदेत शरद पवारांनी गडकरींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. राज्यात आणि केंद्रात वेगवेगळं सरकार असताना खूप वेळा राज्यावर अन्याय होतो असं पाहण्यात आहे. मात्र, असे होऊ न देणे केंद्रात असलेल्या महाराष्ट्रीयन नेत्यांवर असतं. नितीन गडकरी हे कायम राज्यातील प्रश्नांना केंद्रात वाचा फोडतात, असे म्हणत पवारांनी गडकरींवर स्तुतीसुमने उधळली. Sharad Pawar says Gadkari is the only ‘because of this’! ; Gadkari says there is no need for petrol-diesel now
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेचे उद्घाटन झालं. त्यावेळेस बोलत होते. परिषदेमध्ये खासदार शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री शंभुराजे देसाई, मंत्री विश्वजित कदम, मंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर उपस्थित आहेत.
शरद पवार म्हणाले, नितीन गडकरी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देखील ते लक्ष ठेवून असतात आणि याचेच कौतुक पवारांनी केले आहे. “महाराष्ट्रात ऊसाच्या संबंधित अथवा साखरेसंदर्भात कोणताही प्रश्न निर्माण झाला की जी व्यक्ती शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभी राहते, ती म्हणजे नितीन गडकरी… ” अशा पद्धतीने ते व्यक्त झाले आहेत.
शरद पवारांनी म्हटलं की, आपल्या राज्यात उस वगळून इतर पिकाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळेच शेतकरी उसाकडे वळतात. त्यात चुकीचे नाही. मात्र उस पिकवताना प्रती एकरी उत्पादन वाढविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक कारखान्याने उस विकास योजना राबविण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/554639002880500/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
तज्ञांच्या अंदाजानुसार यावर्षीपेक्षा पुढील वर्षी उसाचे लागवड क्षेत्र आणखी वाढेल. त्यामुळे उसाच्या तोडणीचे नियोजन लागवड पासून करावे लागेल, असं पवार म्हणाले. त्यांनी म्हटलं की, यावेळेस पाणी आणि पाऊस समाधानकारक असणार आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन आणखी वाढेल. यावेळेस विक्रमी साखर निर्यातीला संधी आहे. यावर्षी भारतातून 121 देशात साखर निर्यात करण्यात आली. असे कधी झाले नव्हते, असं देखील पवारांनी म्हटलं आहे.
तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील साखर परिषदेत बोलताना मोठं विधान केलं. पेट्रोल डिझेल संपणार. त्याची जागा ग्रीन हायड्रोजन घेणार आहे, असं ते म्हणाले. तसेच पाणी आणि बायो मासपासून ग्रीन हायड्रोजन तयार होतो. प्रत्येक साखर कारखान्यात ग्रीन हायड्रोजन तयार झाला तर साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पादन मिळेल, असंही ते म्हणाले.
देशात पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई वाढल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातोय. असे असताना पेट्रोल, डिझेलला पर्यायी इंधन शोधले जात आहे. यावर भाष्य करताना आता पेट्रोल, डिझेल संपणार असून ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. राज्यात इथेनॉल निर्मिती करणारी एक अर्थव्यवस्था तयार केली पाहिजे, असं मत गडकरी यांनी व्यक्त केलंय. त्यांनी ऊस शेती, साखर कारखाने तसेच इथेनॉल निर्मिती यावरदेखील भाष्य केलंय.
येणाऱ्या काळात इथेनॉलचा वापर सुरु करावा असे आवाहन त्यांनी केले. “फ्लेक्स इंजिनमध्ये १०० टक्के पेट्रोल ऐवजी १०० टक्के इथेनॉल वापरता येईल. त्यासाठी इंजिन कंपनीला सांगतोय, पुण्यातील दुचाकी आणि रिक्षा इथेनॉलवर चालवावेत. मी इथेनॉल पंप टाकायला सांगतो. पुण्यात किती प्रदूषण आहे. त्यामूळे महाराष्ट्रात अजित पवार यांनी पुढाकार घ्यावा. येणाऱ्या काळात पुण्यात इथेनॉलचा वापर सुरु करावा,” असे आवाहन गडकरी यांनी केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/554628102881590/