अक्कलकोट : कर्जाळ (ता.अक्कलकोट) येथील पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका ४० वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज शनिवारी (ता. 4) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला. हा अपघात रस्ते कंत्राटदारावराच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामस्थांनी दोन तास रस्ता रोखून धरला. Akkalkot: Woman killed in Karjal bridge accident; Angry villagers blocked the road
कविता राजेंद्र माळगे (वय ४०, रा.दहिटणेवाडी, ता.अक्कलकोट) असे अपघातामध्ये मयत महिलेचे नाव आहे. कविता माळगे आपल्या मुलीच्या बाळतंपणासाठी तिला घेऊन कर्जाळला आपल्या माहेरी आली होती. कविता अक्कलकोट ला जाऊन कर्जाळला घरी जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जागेवर मयत झाली.
कर्जाळ ग्रामस्थांनी सर्व्हिस रस्ता दोन्ही बाजूला वेळेत पूर्ण न झाल्याने अपघात झाला असल्याचे म्हटले. जीआरआयएल हायवेचे अधिकारी जोपर्यंत जागेवर येत नाहीत व पंचनामा होत नाही तोपर्यंत प्रेत हलविणार नसल्याची भूमिका संतप्त ग्रामस्थानी घेतली. सोलापूर अक्कलकोट रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्री आठ वाजल्यापासून ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या.
□ कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळावर हजर झाले. ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. याधीही दोन अपघात झाले आहेत. शाळकरी मुलांनाही जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. लवकर सर्विस रोड पूर्ण झाले पाहिजे व रस्ते कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, यावर ग्रामस्थ ठाम होते. शेवटी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक कोळी यांनी सकाळी एकत्रित बैठक घेऊन दोषीवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थानी माघार घेतल्याने वाहतूक सुरळीत झाली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/554653679545699/
उत्तरीय तपासणीसाठी प्रेत ग्रामीण रूग्णालय अक्कलकोट येथे हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्याचे काम चालु होते. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, सहायक पोलिस निरीक्षक काकडे, पोलीस उपनिरीक्षक काळे, पुजारी व टिम घटना स्थळी येऊन भेट दिली.
□ मयताचा पती अगोदरच वारला
मयत कवितेचा पती दहा वर्षापूर्वीच वारला आहे. तिला तीन विवाहित मुलीच आहेत. काम करून तिने रेणुका, दिपाली, निकीता या तीन मुलीचे स्वकर्तृत्वावर लग्न लावून दिले आहे. आता मुलीच्या बाळतंपणासाठी दहिटणेवाडी येथे सोय नसल्याने आपल्या माहेरी कर्जाळ येथे घेऊन आली होती.
जीआरआयएल कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला आहे. याआधीही दोन अपघात झाले आहेत. दोन्ही बाजुंनी सर्विस रोड नाही. एस टी बसेस पण पुलावर थांबतात. नागरिकांना नाईलाजाने पुलावरून रस्ता ओलांडावा लागत असल्याचे कर्जाळचे माजी सरपंच रेवणसिध्द बिराजदार यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/554558112888589/