□ माजी विद्यार्थी डॉ. तांदूळवाडकर यांची बांधिलकी
□ २० लाख रूपयांच्या यंत्रामुळे रूग्णांना मिळणार दिलासा
सोलापूर : डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी डॉ. सुनीता तांदूळवाडकर यांनी कृतज्ञता व सामाजिक बांधिलकी जोपासत वीस लाख रुपये किमतीचे संपूर्ण लॅपरोस्कोपिक सर्जिकल रुग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागास दान केल्याची माहिती स्वतः डॉ. तांदूळवाडकर यांनी दिली. Alumni Commitment: Donation of 20 Laparoscopic Machine for Solapur Civil hospital
ऑपरेशन थिएटर सिव्हिल तांदूळवाडकर या डॉ. सोलापुरातील डॉ. डॉ. वैशंपायन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी आहेत. डॉ. तांदूळवाडकर या एक प्रस्थापित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओबीजीवायएन विशेषज्ज्ञ आहेत. त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला आणि डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १९८०-१९८९ मध्ये एमबीबीएस व एम.डी. (प्रसूती आणि स्त्रीरोग) शिक्षण पूर्ण केले.
२० लाख रूपये किमतीचे हे यंत्र शुक्रवारी (ता. 3) समारंभपूर्वक शासकीय रुग्णालयास प्रदान करण्यात आले. बी ब्लॉक इमारतीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर पुणे येथील सोलो क्लिनिकच्या संचालिका तसेच रुबी हॉल आणि डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पुणे येथील आयव्हीएफ अँड एन्डोस्कोपी विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिता तांदुळवाडकर, डॉ. वासंती मुनोत, शासकीय रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागातील प्रमुख डॉ. विद्या तिरणकर, डॉ. अबोली वेलणकर, डॉ. अंजली जम्मा, डॉ. विजय पवार उपस्थित होते.
प्रारंभी एन्डोस्कोपी मशीनचे पूजन डॉ. सुनिता तांदुळवाडकर, डॉ. वासंती मुनोत, डॉ. विद्या तिरणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. तांदुळवाडकर म्हणाल्या, मी मूळची सोलापूरची आहे. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांपैकी उत्कृष्ट असे महाविद्यालय आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/554444022899998/
वैद्यकीय शास्त्राचे सर्वोत्तम शिक्षण येथे दिले जाते. माझ्यासारख्या अनेक डॉक्टरांचे देशभरात नाव झाले. त्याचे सर्व श्रेय या महाविद्यालयातील शिक्षणाला व शिक्षकांना जाते. श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत आणि देशभरातील सर्वोत्कृष्ट डॉक्टर सोलापुरातून घडावे या हेतूने एन्डोस्कोपी मशीन शासकीय रुग्णालयास देण्यात आली आहे. डॉ. मनीषा यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. अजित गांधी तसेच शासकीय रुग्णालयातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सध्या डॉ. तांदूळवाडकर सोलो क्लिनिक आयव्हीएफच्या संस्थापक तसेच पुण्यातील रुबी हॉल आणि आयव्हीएफ क्लिनिकच्या ओबीजीवायएन विभागाच्या आणि डॉ. डी. वाय. पाटील आयव्हीएफ आणि एंडोस्कोपी केंद्राच्या प्रमुख आणि आणि एंडोस्कोपी सेंटर, पुणे येथे सल्लागार आणि मुख्य सल्लागार आहेत. त्यांनी सोलो स्टेम सेल्सडिजनरेटिव्ह रोगांसाठी स्टेम पेशी संशोधन आणि अनुप्रयोग केंद्रदेखील सुरू केले आहे.
ज्या विभागात स्वतः शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले. त्या विभागाला हे मशीन देणे योग्य वाटले. सध्याच्या पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी जे सध्या त्यांच्या सर्जिकल शिक्षणाची सुरुवात करत आहेत. शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक करण्यासाठी स्वतःहून मार्गदर्शन करणार असल्याचेही डॉ. तांदूळवाडकर यांनी सांगितले.
□ एन्डोस्कोपी मशीनमुळे रूग्णांना मिळणार अत्याधुनिक सुविधा
डॉ. सुनिता तांदुळवाडकर यांनी २० लाख रूपये खर्चून बसवलेल्या या यंत्रामुळे गोरगरीब रूग्णांना मोठा फायदा होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त एन्डोस्कोपी मशीनमुळे दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करून कमी टाक्याची शस्त्रक्रिया करता येणे शक्य होणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/554465956231138/