सोलापूर : ऑपरेशन मुस्कान 11 अंतर्गत पथकाने गस्त घालताना जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील एका कापड दुकानात काम करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींची अश्लीलतेपासून मुक्तता केली आहे. Freedom of three minor girls from pornography through nine teams
एका कापड दुकानामध्ये तीन अल्पवयीन मुली कामावर असल्याचे दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दुकानमालक मुलींना अश्लील भाषेत बोलत असे तसेच शरीरावर नको त्या भागाला स्पर्श करीत असे याबद्दल मालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे कारवाई करून तीन मुलींना बालकल्याण समितीसमोर हजर करून त्यांची मुक्तता करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त बापूबांगर तसेच महिला पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्कान ऑपरेशन पथकाच्या महिला फौजदार व्हट्टे, चाइल्ड लाइन सदस्या संगीता पारशेट्टी, महिला पोलीस अंमलदार परीट, लोकरे यांनी केली.
□ बालकामगाराची त्वरित सुटका
७ ते १६ वयोगटातील बालक हे विविध व्यवसायात कष्टाचे काम करत असताना आढळून आल्यास किंवा माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्ष येथे (फोन ०२१७ – २७४४६००) संपर्क साधून माहिती द्यावी. त्वरित बालकामगाराची सुटका करण्यात येईल, अशी माहिती त्या पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/555089836168750/
》 ऑपरेशन मुस्कान-११ मोहीम सुरु
● नऊ पथकांमार्फत महिनाभर बालक शोध उपक्रम
सोलापूर : राज्यात ऑपरेशन मुस्कान-११ महाराष्ट्र ही शोधमोहीम १ ते ३० जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध विभाग यांच्या आदेशावरुन रेकॉर्डवरील बालकांचा शोध घेण्याची मोहीम शहरामध्ये राबविण्यात येत आहे.
ऑपरेशन मुस्कान-११ या मोहिमेची सुरुवात पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रसंगी पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी, मुलींचे निरीक्षणगृहाचे शरणार्थी, चाइल्डलाइनचे आनंद ढेपे हे उपस्थित होते.
ऑपरेशन 11 करिता शहरातील सात पोलीस ठाण्यांकडील प्रत्येकी एक पोलीस अधिकारी व तीन महिला अंमलदार, महिला कक्षाकडील एक पोलीस अधिकारी. दोन महिला कर्मचारी, दामिनी पथकातील ११ महिला पोलीस अंमलदार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री व चार अंमलदार असे ९ पोलीस अधिकारी व ३८ महिला पोलीस अंमलदार यांची एकूण नऊ पथके तयार करण्यात आली आहेत. चायनिज गाडी, गॅरेज, चहा टपरी, कापड दुकान, ज्युस सेंटर अशा विविध ठिकाणांहून शोध मोहीम चालणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/555049432839457/