Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

तीन अल्पवयीन मुलींची अश्लीलतेपासून मुक्तता

नऊ पथकांमार्फत महिनाभर बालक शोध उपक्रम

Surajya Digital by Surajya Digital
June 5, 2022
in Hot News, सोलापूर
0
वाढदिवसाच्या कारणावरून सोलापुरात दगडफेक; पोलिस वेळेत आल्याने अनर्थ टळला
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  : ऑपरेशन मुस्कान 11 अंतर्गत पथकाने गस्त घालताना जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील एका कापड दुकानात काम करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींची अश्लीलतेपासून मुक्तता केली आहे. Freedom of three minor girls from pornography through nine teams 

एका कापड दुकानामध्ये तीन अल्पवयीन मुली कामावर असल्याचे दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दुकानमालक मुलींना अश्लील भाषेत बोलत असे तसेच शरीरावर नको त्या भागाला स्पर्श करीत असे याबद्दल मालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे कारवाई करून तीन मुलींना बालकल्याण समितीसमोर हजर करून त्यांची मुक्तता करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त बापूबांगर तसेच महिला पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्कान ऑपरेशन पथकाच्या महिला फौजदार व्हट्टे, चाइल्ड लाइन सदस्या संगीता पारशेट्टी, महिला पोलीस अंमलदार परीट, लोकरे यांनी केली.

□ बालकामगाराची त्वरित सुटका

 

७ ते १६ वयोगटातील बालक हे विविध व्यवसायात कष्टाचे काम करत असताना आढळून आल्यास किंवा माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्ष येथे (फोन ०२१७ – २७४४६००) संपर्क साधून माहिती द्यावी. त्वरित बालकामगाराची सुटका करण्यात येईल, अशी माहिती त्या पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

》 ऑपरेशन मुस्कान-११ मोहीम सुरु

● नऊ पथकांमार्फत महिनाभर बालक शोध उपक्रम

सोलापूर : राज्यात ऑपरेशन मुस्कान-११ महाराष्ट्र ही शोधमोहीम १ ते ३० जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध विभाग यांच्या आदेशावरुन रेकॉर्डवरील बालकांचा शोध घेण्याची मोहीम शहरामध्ये राबविण्यात येत आहे.

ऑपरेशन मुस्कान-११ या मोहिमेची सुरुवात पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रसंगी पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी, मुलींचे निरीक्षणगृहाचे शरणार्थी, चाइल्डलाइनचे आनंद ढेपे हे उपस्थित होते.

ऑपरेशन 11 करिता शहरातील सात पोलीस ठाण्यांकडील प्रत्येकी एक पोलीस अधिकारी व तीन महिला अंमलदार, महिला कक्षाकडील एक पोलीस अधिकारी. दोन महिला कर्मचारी, दामिनी पथकातील ११ महिला पोलीस अंमलदार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री व चार अंमलदार असे ९ पोलीस अधिकारी व ३८ महिला पोलीस अंमलदार यांची एकूण नऊ पथके तयार करण्यात आली आहेत. चायनिज गाडी, गॅरेज, चहा टपरी, कापड दुकान, ज्युस सेंटर अशा विविध ठिकाणांहून शोध मोहीम चालणार आहे.

Tags: #Freedom #three #minorgirls #pornography #nine #teams #solapur#तीन #अल्पवयीन #मुली #अश्लीलता #मुक्तता #नऊ #पथकांमार्फत #महिनाभर #बालक #शोध #उपक्रम
Previous Post

हॉटेल व्यावसायिकाच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करून लुटले

Next Post

Kanpur violence प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी: भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मांना आणि जिंदल यांना केले निलंबित

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Kanpur violence  प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी: भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मांना आणि जिंदल यांना केले निलंबित

Kanpur violence प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी: भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मांना आणि जिंदल यांना केले निलंबित

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697