नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. “इतकी वर्षे संघाचे नेतृत्व करणे ही एक सन्मानाची गोष्ट होती. याने मला एक व्यक्ती म्हणून निश्चितच आकार दिला आणि आशा आहे की भारतीय महिला क्रिकेटलाही आकार देण्यास मदत झाली,” असं तिने म्हटलं. सोशल मीडियावरून मितालीने निवृत्तीची घोषणा केली. Mithali Raj Retirement India’s women captain Mithali Raj has announced her retirement
मिताली राजने दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या तिच्या क्रिकेट कारकिर्दीत पूर्णपणे राज्य केले. ती भारतातील महिला क्रिकेटची ओळख असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक विजयही मितालीच्या नावावर आहेत. अशा परिस्थितीत तिने निवृत्ती घेणे ही महिला क्रिकेट विश्वातील मोठी घटना मानली जात आहे.
भारताची वनडे आणि कसोटी कर्णधार मिताली राजने बुधवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मितालीने ट्विट करत आपल्या चाहत्यांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. “तुमच्या सर्व प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद! मी तुमच्या आशीर्वाद आणि समर्थनासह माझ्या दुसऱ्या डावाची सुरुवात करत आहे.” असं तिन ट्विटमध्ये म्हंटल आहे. विशेष म्हणजे तिचं क्रिकेटवर कधीच प्रेम नव्हंत हे तिनं अनेकवेळा सांगितल आहे.
मितालीच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर तिने कायमच वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळतं. अवघ्या 10 वर्षांची असताना भरतनाट्यम किंवा क्रिकेट यापैकी एकाची निवड करायची वेळ आली त्यावेळी तिने क्रिकेटची निवड केली. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी मितालीने 26 जून 1999 साली आयरलँडविरोधातल्या सामन्यात वन-डेमध्ये डेब्यू केलं होतं.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/556933179317749/
मिताली राजचा जन्म ३ डिसेंबर १९८२ मध्ये जोधपुर येथे झाला. तिला भरतनाट्यमची आवड होती. तिचं पहिलं प्रेम भरतनाट्यम होत. हे तिनं अनेकदा मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. इतकेच नव्हे तर तिनं आपली आवड जपण्यासाठी तिनं ट्रेनिंगदेखील केल होत. पण वडिलांच्या हट्टामुळे हातामध्ये बॅट घ्यावी लागली.
मितालीचा भाऊ आणि वडील माजी क्रिकेटर आहेत. त्यांनी तिला क्रिकेट खेळण्याचे प्रोत्साहन दिलं. आणि तिला क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली. मिताली राज हिच्या नावे याआधीही अनेक विक्रमांची नोंद आहे. भारताचा महिला क्रिकेट संघ 2006 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळण्यासाठी उतरला होता. त्यावेळी भारताची कर्णधार मिताली राज हीच होती.
म्हणजेच भारतासाठी पहिली महिला टी-20 कर्णधार होण्याचा रेकॉर्ड मितालीच्या नावावरच कायम असेल. मिताली राजच्या नावावर भारताकडून महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्डही आहे. तिने टी-20 सा दोन हजारपेक्षाही जास्त धावा बनवलेल्या आहेत.
मिताली राज भारतीय महिला संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. तिने तिच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. खरंतर ती भारतीय महिला क्रिकेटचा कणाच होती. मिताली वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाज आहे. तिने 232 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 50.68 च्या सरासरीने 7805 धावा केल्या.
□ मिताली राजची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मितालीने 12 कसोटी सामने खेळले आहेत यात तिने 699 धावा काढल्या. तर 232 वनडे सामन्यांत तिने 7805 धावा केल्या आहेत शिवाय तिने 89 टी-20 सामने खेळले आहेत. यात तिने 2364 धावा केल्या आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/557045175973216/