पार्क मैदानाच्या भाड्यात कपात
सोलापूर : इंदिरा गांधी स्टेडियमचे नूतनीकरण स्मार्ट सिटी कंपनीकडून करण्यात आले. या स्टेडियमचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. शिवाय महापौर चषकअंतर्गत उद्घाटनाचा क्रिकेटचा सामना घेण्यात येणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट खेळाडू आणण्याची तयारी महाराष्ट्र
क्रिकेट असोसिएशनने केली आहे. International players will attend the inauguration of Indira Gandhi Stadium
सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीने अत्याधुनिक पद्धतीचे पार्क मैदान तयार केले आहे. या मैदानाचा उपयोग खेळाडूंना होण्यासाठी स्टेडियमचे लवकरच उद्घाटन करण्यात यावे अशी सातत्याने नागणी सुरू होती. पालकमंत्र्यांची वेळ घेऊन उद्घाटनाचा समारंभ करण्याचा मानस आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन करावे असेही मनात आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. याबाबतीत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेशी चर्चा केली जाईल असे शिवशंकर यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून महापौर चषक क्रीडा स्पर्धा घेतली गेली नाही. आता चांगले मैदान तयार झाले आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. इतर खेळाबरोबरच क्रिकेटचे सामनेदेखील महापौर चषक स्पर्धेत खेळविण्यात येतील, अशी माहितीही आयुक्तांनी दिली.
काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सोलापूर देण्याचे क्रिकेट महापालिकेने मानपत्र ठरवले आहे. तसे ठरावदेखील सभागृहात एक मताने झाले आहेत. सुनील गावस्कर, कपिलदेव, सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गज खेळाडूंना मानपत्र देण्याचे ठराव करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत नगरसचिव यांच्याकडून माहिती घेण्यात येईल. उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून या खेळाडूंना मानपत्र देण्याचाही विचार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपस्थित होते.
क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी आयुक्त कार्यालयात झाली. महापालिका आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महापौर चषक जुलै महिन्यात घेण्याचे नियोजने करण्यात येत आहे. क्रिकेट सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएनशने निश्चित केलेले दर असतील. या वेळी क्लबसाठी रोज तीन तास सरावासाठी दरमहा
९ ऐवजी ५ हजार रुपये दर निश्चित करण्यात आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/556933179317749/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी शनिवार व रविवारी १५ हजार तर अन्य दिवस १२ हजार रुपये प्रतिदिन दर असेल. मैदानासाठी आकारण्यात आलेले दर कमी करावे, अशी मागणी क्रिकेट असोसिएशनची आहे. या वेळी माजी नगरसेवक नागेश वल्याळ, जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव चंद्रकांत रेम्बर्स्, खजिनदार प्रकाश भुतडा आदी उपस्थित होते.
□ पार्क मैदानाच्या भाड्यात कपात
मंगळवारी, स्टेडियम कमिटीची बैठक पार पडली. यावेळी पार्क मैदानाच्या भाड्याबाबत ४ मे रोजी घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करण्यात येऊन नवे दर निश्चित करण्यात आले.
शनिवारी आणि रविवारी मैदानावर सामने घेतल्यास दर दिवशी तेरा हजार रुपये तर इतर दिवशी नऊ हजार रुपये आकारले जातील, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितली. क्रिकेटची स्पर्धा घेतली तर दर दिवशी सात हजार रुपये याप्रमाणे आकारणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मैदानावर खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, संघटना, क्लब यांना मात्र दरमहा पाच हजार रुपये असे सवलतीचे दर निश्चित केले आहेत. यामुळे गरीब होतकरू खेळाडूंना फायदा होईल असेही आयुक्तांनी सांगितले. टेनिस बॉलवरील सामन्यासाठी देखील दर निश्चित केले आहेत. शनिवार आणि रविवारी सामने असतील तर पंधरा हजार रुपये दर दिवशी आणि इतर दिवशी बारा हजार रुपये घेण्यात येतील, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप, क्रिकेट -संघटनेच्यावतीने माजी नगरसेवक नागेश वल्याळ, -संघटनेचे सचिव चंद्रकांत रेम्बर्स्, खजिनदार प्रकाश भुतडा उपस्थित होते. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सामने असतील तर त्यांच्याच दराप्रमाणे आकारणी केली जाईल. निवड चाचणीचे सामने खेळवले तर कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही, असेही आयुक्त शिवशंकर यांनी स्पष्ट केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/556911302653270/