कुर्डुवाडी : टॉयलेटचा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी देवून पोलिस ठाण्यातून पळून गेल्याची घटना माढा तालुक्यातील कुर्डुवाडीत आज गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. Accused escapes from Kurduwadi police station
राहुल ज्ञानेश्वर मरगळ माळी (वय 25)असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे, बुधवारी पोलिसात कलम 407 नुसार आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता. आज गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयात नेण्यात आले होते. त्याने टॉयलेट्स बहाणा कठड्यावरून उडी मारुन पळुन गेला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सदर संशयित आरोपी राहुल मरगळ (माळी), दशरथ मरगळ (माळी) व दत्ता मरगळ (माळी) आपल्या कुटुंबासह कुर्डू (ता.माढा) येथील फिर्यादी तुकाराम विष्णू पायगण यांच्या शेतात गेल्या दहा महिन्यापासून आठवडा पगारीवर कामाला होते.
शेतातील खोल्यांध्ये त्यांची राहण्याची सोय केली होती. रविवारी, दि.५ जून रोजी वरील सर्व आरोपी पायगण यांचा शेतातील शेती अवजारांसह पायगण यांचा टमटम (एम एच ४५ टी २२७९ ) घेऊन पळून गेले होते. याबाबत पायगण यांनी दि. ६ रोजी फिर्यादी दिली. या संशयित आरोपींना त्यांच्या पत्त्यावरुन नेवासे येथून बुधवार दि. ८ रोजी रात्री अटक करुन आणले होते.
आरोपीमधील राहुल मरगळ याने लघुशंकेचे कारण सांगून पोलिसांच्या हाती तुरी देत भिंतीवरून उडी मारून पळून गेला. पोलिस सदर आरोपीचा फोटो सर्व समाजमाध्यमावर टाकून तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेवरुन सदर आरोपी बद्दल माहिती प्रसारित केली. पोलिस सदर आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी पळून गेला आहे, मात्र आरोपी जवळ पैसे नसल्यामुळे तो कोणत्याही वाहनाने पळून जाऊ शकत नसल्याची शक्यता आहे. मात्र रेल्वेने पळून जाऊ शकतो. या आरोपीला शोधण्यासाठी सर्वत्र ठिकाणी पोलीस पाठवण्यात आले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/557869519224115/
● सोलापूरच्या विजापूर रोडवरील उच्चभ्रू वसाहतीत कुंटणखाना; दोघींना अटक
सोलापूर : विजापूर रोडवरील एका उच्चभ्रू वसाहतीतील घरामध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकून दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने केली. यातील पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
वर्षा दत्ता माशाळे (वय ३२, रा. महालक्ष्मी नगर), सुजाता विवेक कांबळे (वय ३३, रा. स्वामी विवेकानंद नगर, ओमगर्जना चौकाजवळ) असे अटक करण्यात आलेल्या महिलाची नावे आहेत. महालक्ष्मी नगरात घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती, अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांना मिळाली होती. पथकासह सापळा रचला.
बनावट ग्राहक पाठवून दिले. बनावट ग्राहक आत गेला, त्याने पैसे दिले व आत जाताना बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिसांना इशारा दिला. इशारा मिळताच पोलिसांनी घरात धाड टाकली. तेव्हा कुंटणखाना चालवणाऱ्या दोन महिला व पीडित महिला आढळून आल्या. पीडितेकडे चौकशी केली असता, दोघींनी व्यवसाय करण्याच्या बदल्यात पैसे मिळत असल्याचे सांगितले. या प्रकरणी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजया कुर्री, हवालदार बंडगर, पोलीस नाईक सत्तार पटेल, महिला पोलीस नाईक गवळी, मुजावर, मंडलिक, उषा माळगे, सीमा खोगरे, शैला चिकमळ, चालक गोरे यांनी पार पाडली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/557912935886440/