सोलापूर : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली असताना अपक्षांनाही तितकाच भाव आला आहे. अपक्षांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र सोलापुरातील दोन अपक्ष आमदार संजयमामा आणि राजाभाऊ आपल्या मताचे दान कोणाच्या पारड्यात टाकणार याबाबत चर्चा होत आहे. The whip does not apply to independent legislators; Will vote for independent MLA of Solapur tomorrow? Sanjay Shinde Rajendra Raut
उद्या शुक्रवारी (ता. १० जून) राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सध्याचे बलाबल पाहता सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्यावतीने अपक्ष आमदारांची मनधरणी करण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील संजयमामा शिंदे आणि राजेंद्र राऊत या अपक्ष आमदारांचे वजनही वाढले आहे. या दोघांना आपल्या गोटात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राज्यसभेच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीत अपक्ष उपस्थित आमदारांना त्यांचे मतदान कुणाला दाखवता येणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
अपक्ष आमदार ज्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत, त्या पक्षाच्या प्रतिनिधीला त्याने त्याचे मत दाखविणे बंधनकारक असेल का, अशी विचारणा विधानमंडळ कार्यालयाने निवडणूक आयोगाला केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/557835759227491/
पक्षांच्या आमदारांना त्यांचे मत तिथे पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवूनच करावे लागते आणि ते दाखविले नाही वा पक्षाचा व्हिप झुगारून अन्य उमेदवारास मत दिले तर ते मत अवैध ठरते असा नियम आहे. अपक्ष आमदारांच्या मतदानाबाबत आयोगाने स्पष्ट केले की, ते कोणालाही दाखवून मत करू शकत नाहीत आणि तसे केले तर त्यांचे मत बाद ठरते. त्यामुळे अपक्ष आमदारांना व्हिप लागू होणार नाही व कुणाला दाखवून मत देता येत नाही.
सोलापूर जिल्ह्यातील ‘करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी आपण पवारांसोबत असल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असल्याचे सांगितल्याचे वृत आहे.
□ ब्रेकिंग – ठाकरे सरकारला सर्वात मोठा झटका
मुंबई – PMLA विशेष कोर्टाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभेसाठी मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. ईडीने त्यांच्या मतदानाच्या हक्कावर आक्षेप घेतला. तसेच मलिक आणि देशमुख यांना मतदानाची परवानगी देऊ नये, अशी विनंती कोर्टाला केली. दरम्यान उद्या (10 जून) राज्यसभेची निवडणूक आहे. यात कोर्टाच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीची दोन मते कमी झाले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/557779875899746/