नवी दिल्ली : देशात राष्ट्रपती निवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलैला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. मतमोजणी 21 जुलैला होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ 24 जुलैला संपणार आहे. त्याआधी नवीन राष्ट्रपतींची निवड केली जाणार आहे. यासाठी आमदार आणि खासदार मतदान करणार आहेत. The names are being discussed for the post of President
देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलैला मतदान होणार आहे. मतमोजणी 21 जुलैला होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ 24 जुलैला संपणार आहे. त्याआधी नवीन राष्ट्रपतींची निवड केली जाणार आहे. सध्या केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, जुअल ओरांव, माजी राज्यपाल द्रोपदी मुर्मू, अनसुईया उइके यांच्या नावाची चर्चा राष्ट्रपतीपदासाठी आहे.
सुमित्रा महाजन (माजी लोकसभा अध्यक्ष), आनंदीबेन पटेल (राज्यपाल -उत्तरप्रदेश), अनसूया उईके(राज्यपाल छत्तीसगड), तमिलसाई सुंदरराजन (राज्यपाल -तमिळनाडू), द्रोपदी मुर्मू(राज्यपाल झारखंड) ही पाच नावं सध्या राष्ट्रपती पदासाठी चर्चेत आहेत. यामुळे यंदाच्या वेळी देशाला पहिल्यांदाच महिला राष्ट्रपती मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/557779875899746/
सध्या भाजपच्या नेतृत्वातील एनडीएकडे विरोधकांपेक्षा अधिक संख्या आहे. त्यामुळे एनडीएचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 50 टक्के मतदान एनडीएचे उमदेवार रामनाथ कोविंद यांच्या बाजूने झाले होते. काही प्रादेशिक पक्षांनीदेखील कोविंद यांना पाठिंबा दिला होता.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा यांच्यासह राज्यांच्या विधानसभा, केंद्रशासित दिल्ली व पुदुच्चेरी यांच्या विधानसभांचे सदस्य हे मतदार असतात. विधानसभांचे 4120 आमदार, लोकसभेचे 543 खासदार, राज्यसभेचे 233 खासदार असे एकूण 4893 मतदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतात. तर, राष्ट्रपती नामनिर्देशित बारा खासदार, संसद आणि विधानसभेतील नामनिर्देशित सदस्य आणि विधान परिषदांचे सदस्य या निवणुकीत मतदान करू शकत नाही.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी काही पात्रता निकष आहेत. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा भारतीय नागरीक असावा आणि त्याचे वय 35 हून अधिक असावे. त्याशिवाय, त्याला किमान 100 आमदार, खासदारांचा पाठिंबा असावा. यामध्ये 50 सूचक आणि 50 अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करतात. हे आमदार, खासदार थेट निवडून आलेले प्रतिनिधी असावेत. एका उमेदवाराला अधिकाधिक चार नामांकने दाखल करता येतात.
उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतीपदी निवडण्याची एक अप्रत्यक्ष परंपरा रुजली होती. मात्र, मागील चार टर्मपासून उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीपदी नियुक्त झाले नाहीत. भाजपचे कृष्णकांत आणि भैरो सिंह शेखावत हे उपराष्ट्रपती होते. मात्र, त्यांना राष्ट्रपतीपदाची संधी मिळाली नाही. त्यांच्याऐवजी एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी संधी मिळाली. तर, दोन वेळेस उपराष्ट्रपती राहिलेल्या हामिद अन्सारी हे दोन वेळेस उपराष्ट्रपती झाले होते. मात्र, त्यांनाही राष्ट्रपतीपदासाठी संधी मिळाली नाही.
https://www.facebook.com/109399567404448/posts/557617569249310/