अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पितापूर येथे 8 कोटी 68 लाख रुपये खर्चाचे दोन कोल्हापूर पद्धती बंधारे मंजूर झाल्याची माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. Akkalkot: MLA Sachin Kalyanshetti approves two Kolhapur style dams in Pitapur
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या वतीने 0 ते 100 हेक्टर प्रयत्नच्या सिंचन क्षमतेची कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची निर्मिती प्रस्तावित होती. त्यानुसार या दोन बंधाऱ्यांची निर्मितीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यातील पितापूर एक येथील बंधारा साठवण क्षमता 250.51 सहस्त्र घन मीटर एवढा असून त्याचा खर्च 3 कोटी 59 लाख 91 हजार 213 रुपये असून अनुषंगिक खर्च 29 लाख 72 हजार 778 रुपये इतका असून एकूण खर्च हा 3 कोटी 89 लाख 63 हजार 991 रुपये एवढा आहे.
त्याची सिंचन क्षमता ही 90 हेक्टर एवढी असणार आहे. त्याचप्रमाणे पितापूर दोन येथील बंधारा साठवण क्षमता 296.73 सहस्त्र घन मीटर एवढा असून त्याचा खर्च 4 कोटी 42 लाख 13 हजार 87 रुपये असून अनुषंगिक खर्च 36 लाख 49 हजार 750 रुपये इतका आहे. एकूण खर्च हा 4 कोटी 78 लाख 62 हजार 837 रुपये एवढा आहे. त्याची सिंचन क्षमता ही 62.9 हेक्टर एवढी असणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/559158459095221/
या पितापूर येथील दोन्ही बंधाऱ्यांचा एकूण 8 कोटी 68 लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. पितापूर हे गाव कुरनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील गाव आहे. दरवर्षी तुळजापूर भागात मोठा पाऊस होतो आणि हरणा नदीला पूर येत असतो. त्यामुळे ग्रामस्थ बांधवाना वाडी वस्तीवर जाणे आणी इतर महत्वाच्या कामासाठी पुराचे पाणी हा अडथळा ठरत होता.
या गावातील व भागातील ग्रामस्थांची सतत ही गैरसोय दूर करण्याची मागणी होत होती. अखेर आमदार सचीन कल्याणशेट्टी यांनी लक्ष घालून पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे. प्रशासकीय मंजुरीने हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पूर्ण झाल्यास हा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.
□ पितापूर गावाला दरवर्षी पुराच्या आणी मोठ्या पावसाने पाणी वाढत होते त्यातून ग्रामस्थांना सतत त्रास सहन करावा लागत होता.यासाठी पितापूर येथेच दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर झाले आहेत.यातून या भागातील नागरिकांना कायम सोसाव्या लागणाऱ्या त्रासातून सुटका होणार आहे.
सचिन कल्याणशेट्टी
आमदार,अक्कलकोट
□ महाराष्ट्रात काँग्रेस करणार शक्तीप्रदर्शन
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आलेल्या ईडीच्या समन्स विरोधात काँग्रेसने आंदोलन करायचं ठरवलं आहे. सोमवारी 13 जून रोजी सकाळी 11 वाजता ईडीच्या मुंबईतील बेलॉर्ड इस्टेट आणि नागपुरातील सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयात तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि अमर राजूरकर यांच्यावर आंदोलनाच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/559058032438597/