नाशिक : पिकांवर फवारणी करताना शेतकऱ्यांवर किटकनाशकाचा परिणाम होऊ नये म्हणून नाशिकच्या चांदवड येथील विद्यार्थ्यांनी फवारणी यंत्र तयार केले आहे. हे यंत्र रिमोटवर चालू शकते. शेतकरी याला बांधावरती बसून सुध्दा ऑपरेट करू शकतात. तसेच हे यंत्र गवत कापण्याचेही काम करते. या यंत्राला चार्ज केल्यावरती ते 1 तास वापरता येते. हे विद्यार्थी एसएनजेबी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत आहेत. Sophisticated sprayer Sophisticated sprayer made by students of Nashik
फवारणी करतांना शेतकऱ्यांवर येणारे फवारे यासाठी कारणीभूत असल्याचे लक्षात येताच औषध फवाऱ्यांचा संपर्क टाळण्यासाठी अत्याधुनिक फवारणी यंत्र तरुणांनी विकसित केल्याने हे यंत्र सध्या चर्चेत आहे. चांदवड येथील एसएनजेबी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी हे यंत्र विकसित केले आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या पारंपारिक फवारणी यंत्रमध्ये असलेले दोष या अत्याधुनिक फवारणी यंत्रात नसल्याचे सांगितले जात आहे. या अत्याधुनिक फवारणी यंत्राची निर्मिती करणारे सर्व विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत.
पारंपरिक औषध फवारणी यंत्रात असलेले दोष टाळत त्याची निर्मिती करण्यात आली आहे. सदर विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून, शेतकरी कुटुंबातील आहेत. शिक्षण घेत असताना शेतकऱ्यांसाठी नवीन काहीतरी करावे असे त्यांना मनापासून वाटत होते. त्यांनी मल्टिपर्पझ ॲग्रीकल्चर रोबोटची निर्मिती केली. हा रोबोट रिमोटवर चालतो. शेतात फवारणीसाठी शेतकरी बांधावर बसून हा रोबोट चालवू शकतो. त्यामुळे शेतकरी कीटकनाशकाच्या संपर्कात येत नाही. साहजिकच विषबाधा व कुठलीच शारिरीक व्याधी होत नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/559158459095221/
□ रोबोटची किमया
शेतकरी पुत्रांनी मल्टिपर्पझ ॲग्रीकल्चर रोबोटची निर्मिती केली. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हा रोबोट रिमोटवर ऑपेरेट केला जातो आणि याच्या माध्यमातून शेतीतील भरपूर कामे केली जातात. रोबोट इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणार असून, चार्जिंगनंतर साधारणतः एक तास बागेत फवारणी करू शकतो. यात फोर व्हीलर ड्राईव्ह या संकल्पनेचा वापर केला असून, रोबोट चिखलात फसण्याचा प्रकार घडणार नाही. तसेच, रोबोट चालवणे, पंप मीटर, गवत कापणे अशी कामे रिमोटवर होणार आहे. त्यामुळे शेतकरी शेताच्या एका बाजूला बसून रिमोटवर हा रोबोट चालवू शकतो.
ट्रॅक्टरसाठीच्या इंधन खर्चाची बचत होणार असून, पिकांची नासाडी टाळता येणार आहे. वेळेची बचतही होणार आहे. सदर प्रोजेक्टसाठी नामदेव पवार, जगदीश गांगुर्डे, अमित कोतवाल, अमोल ठाकरे यांनी परिश्रम घेतले असून, प्रा. एस. पी. इंगळे यांनी मार्गदर्शन केले.
या विषयी अधिक माहिती देताना झुंबरलाल भंडारी (सह सचिव, एसएनजेबी, चांदवड) यांनी म्हटले की, “आमचे विद्यार्थी आपल्या अभियांत्रिकी कौशल्याचा वापर करून शेतकऱ्यांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे, याचा विशेष आनंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशकांशी थेट संपर्क येऊन होणारी सर्व प्रकारची हानी टाळता येणार आहे.”
यशस्वीरीत्या विकसित केलेल्या यंत्राबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/559126845765049/