सोलापूर /कुर्डूवाडी : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. यात त्यांनी आमदार संजयमामा शिंदे , देवेंद्र भुयार यांनी मतदान केले नसल्याचा आरोप करीत पाहून घेऊची भाषा केली आहे. त्यास संजयमामांनी मी घोडेबाजारतला नाही, उद्धव ठाकरेंना विचारा, असे प्रत्युत्तर दिलंय. Sanjay Mama and Devendra Bhuyar’s response to Sanjay Raut’s allegation Sanjay Shinde Politics
शिवसेनेच्या आँफर असतानाही पक्षात गेलो नाही. मी घोडेबाजारातला असतो तर मी मागेच सेनेची आँफर स्विकारली असती. पण ऊध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना माहित आहे की मी घोडेबाजारातला आहे का नाही. संजय राऊत यांनी लावलेले आरोप चुकीचे आहेत. महाविकास आघाडीला पाठिंबा देत माझं मतदान मी महाविकास आघाडीलाच केले आहे. राऊतांनी केलेले आरोपात काही तथ्य नाही. माझ्या नेत्यांना माझ्यावर विश्वास आहे, असे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाला ऊत्तर देत संजयमामा शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दैनिक सुराज्यला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
आमदार संजयमामा शिंदे यांनी ,महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला होता. मुंबईत आमदारांची झालेल्या बैठकीतही त्यांनी हजेरी लावली होती. मात्र शिवसेनेचे पवार यांना मतदान कमी झाले असल्याने आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. महाडिक यांना ४१ तर पवार यांना ३३ मते मिळाली आहेत. त्यामुळे पवार यांना महाविकास आघाडीतील काही आमदारांनी मतदान केले नाही. काही अपक्ष आमदारांनीही मतदान केले नसल्याचे बोलले जात आहे.
त्यातच शिवसेनेचे राऊत यांनी प्रतिक्रिया देताना बहुजन विकास आघाडी तसेच करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी मतदान दिलें नसल्याचे , राऊत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले .. यावर आमदार संजयमामा शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/559001512444249/
आमदार संजय शिंदे यांच्या प्रतिक्रियेसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
आमदार शिंदे म्हणाले, ‘संजय राऊत यांचे आरोप चुकीचे आहेत. सूचनेप्रमाणे मी मतदान केले आहे. मी कोणताही घोडेबाजार केलेला नाही. राऊत असा आरोप का करत आहेत या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे त्यांनाच विचारले पाहिजे असे सांगितले.
माझ्यावर आरोप करणे चुकीचे आहे. मी घोडेबाजारातील नाही , हे आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहित आहे. माझ्या नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आमच्या नेत्यांपुढे हा विषय मांडला जाईल. विश्वास नसेल तर त्यांनी मत पहिला पाहिजे होते, असेही शिंदे म्हणाले आहेत.
□ ‘संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का?
– शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर आमदार देवेंद्र भुयार यांनी हल्लाबोल केला आहे. भुयार यांनी शब्द देऊन शिवसेनेला मत दिले नाही, असा आरोप राऊत यांनी केला होता. पण, संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का ? हे ब्रह्मदेवापेक्षा मोठे आहेत असे वाटायला लागलंय. मतदान गोपनीय राहते, मी दिले नाही हे यांना कसे माहित, मी महाविकास आघाडीत सुरुवातीपासून आहे, मी कुठलाही दगाफटका केलेला नाही’, असे भुयार यांनी म्हटले.
□ संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा, सांगितली ‘गद्दारां’ची नावं
#SanjayRaut #political #सुराज्यडिजिटल #गद्दार #surajyadigital #RajyaSabhaElections
राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. संजयमामा शिंदे, देवेंद्र भुयार, श्यामसुंदर शिंदे या ‘गद्दार’ आमदारांनी आणि हितेंद्र ठाकूरांच्या पक्षाने आम्हाला मतदान केले नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची नाव आमच्याकडे आहेत पण ठीके पाहून घेऊ, असाही इशारा राऊत यांनी दिला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/558994592444941/