मुंबई : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने रद्द ठरवले. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी 284 मतांमध्येच झाली. मतदान करताना कांदे यांनी नियमाचे उल्लंघन केले, अशी तक्रार करण्यात आली होती. मात्र कांदे यांचे मत बाद करण्याला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. तसेच आम्ही कोर्टात जाणार, असे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. Rajya Sabha election results: Suhas Kande’s vote canceled, politics will go to Shiv Sena court
माझं मत बाद झालं याबाबत कायदेशीर पुरावा माझ्याकडे आलेला नाही. माझ्याकडे ते आलं तर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना आणि कायदेतज्ज्ञांना दाखवून पुढचा निर्णय घेईल. तसंच माझं मत बाद झालं तरी मला खात्री आहे की आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील आणि भाजपचं षडयंत्र हाणून पाडलं जाईल. मी पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करुन न्यायालयात जायचं की नाही ते ठरवेन, अशी प्रतिक्रिया सुहास कांदे यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/559001512444249/
राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली.
निवडणूक आयोगाच्या निकालात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरवण्यात आली परंतु सुहास कांदे यांचे मत बाद करण्याचे आदेश आयोगाने दिले. सुहास कांदे यांचे मत नेमकं का बाद झाले याबाबत निवडणूक आयोगाने त्यांच्या आदेशात स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयोगाने आदेशात म्हटलंय की. कांदे यांनी मतपत्रिका फोल्ड न करता पोलिंग एजेंटकडे नेली. पोलिंग एजेंटला दाखवताना त्यांची मतपत्रिका कॅमेऱ्यात तशी शेजारच्या क्युबिकलमध्ये दिसली. तसेच न दुमडलेली मतपत्रिका घेऊन ते फिरत होते आणि काहींशी बोलत होते. या सर्व प्रकारात मतपत्रिकेत कुणाला मत दिले हे दिसत असल्याने ते नियमांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचे मत बाद करण्याचे आदेश दिले आहेत.
महाविकास आघाडीकडे जेवढे संख्याबळ लागते त्यापेक्षा अधिक मते आहेत. सहकारी आणि अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता.
》 ‘आव आणणाऱ्याची लगेचच फजिती’; संभाजीराजेंचा शिवसेनाला टोला
#Shivsena #संभाजीराजे #सुराज्यडिजिटल #political #फजिती #surajyadigital
राज्यसभेची सहावी जागा भाजपने जिंकल्यावर संभाजीराजे छत्रपतींनी ट्वीट करत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा परि नाहीं दशा साच अंगीं ॥ तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥” याचा अर्थ वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते, अशा अर्थाचे ट्वीट आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/558994592444941/