Tuesday, February 7, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Rajya Sabha election results धक्का देणारी ‘पहाट’ ! संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली…..

Shocking 'dawn'! Rajya Sabha election results Dhananjay Mahadik Sanjay Pawar woke up the whole of Maharashtra

Surajya Digital by Surajya Digital
June 11, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
Rajya Sabha election results धक्का देणारी ‘पहाट’ ! संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली…..
0
SHARES
203
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते. पहाटेच्या या शपथविधीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आज पहाटे राज्यसभेचा निकाल जाहीर झाला. हा निकालही धक्का देणारा ठरला. संजय पवार जिंकतील, असा पूर्ण विश्वास असलेल्या शिवसेनेला भाजपच्या धनंजय महाडिकांनी पराभूत केले. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना पहाटेचे धक्कादायक सरप्राईज दिले, अशी चर्चा सुरुय.Shocking ‘dawn’! Rajya Sabha election results Dhananjay Mahadik Sanjay Pawar woke up the whole of Maharashtra 

महाराष्ट्रात ज्या प्रकारे राजकीय नेते निवडणुकीला सामोरे जात आहेत, ते पाहता राज्यात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अवघ्या 6 जागांसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली. मतमोजणीसाठी जवळपास सर्व आमदार व मंत्री रात्रभर जागे होते. तसेच कोण जिंकणार? हे पाहण्यासाठी लाखो कार्यकर्ते रात्रभर प्रतिक्षेत होते. शेवटी महाविकास आघाडीने 3 व भाजपने 3 जागा जिंकल्या.

राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत अटीतटीची लढत पहायला मिळाली. या सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक यांचा दणदणीत विजय झाला असून शिवसेनेचे संजय पवार हे पराभूत झाले आहेत. यामुळे शिवसेनेसह आघाडी सरकारला या निकालानंतर मोठा झटका लागला आहे. भाजपचे धनंजय महाडिक यांना ४१ मतं मिळाली तर शिवसेनेचे संजय पवार यांना ३३ मतं पडली.

यासह राज्यसभेच्या इतर जागांसाठी प्रफुल्ल पटेल यांना ४३ मतं, संजय राऊत यांना 41मतं, पियुष गोयल यांना 48मतं , अनिल बोंडे यांना ४८ मतं आणि इम्रान प्रतापगडी यांना ४४ मतं असे पहिल्या पसंतीचे मतं मिळाल्याने ते विजयी झाले आहेत.

महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे या सामन्याचे ‘मॅन ऑफ द मॅच’ हे देवेंद्र फडणवीस हेच आहेत. समोर शरद पवार यांच्यासारखा दिग्गज असतानाही त्यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’ असं देवेंद्र फडणवीसांनी महाडिकांच्या विजयानंतर ट्वीट केलं आहे.

सुरुवातीपासून शिवसेनेच्या संजय पवारांचे पारडे जड असतानाही शेवटी भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणीसांनी महाविकास आघाडीकडे शरद पवार यांच्यासारखा दिग्गज समोर असतानाही अचूक स्ट्रॅटेजी आखली आणि विजय खेचून आणला.

देवेंद्र फडणवीस या विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार निवडून आल्याने आनंदाचा क्षण आहे. हा विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो. राज्यातील लोकांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बहुमत दिलं होतं.”

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनंजय महाडिक यांनी 41.5 मतं मिळाली तर शिवसेनेच्या संजय राऊत यांना 41 मतं मिळाली. जे मत बाद झालं, ते मत ग्राह्य धरलं असतं, किंवा मलिकांना मताचा अधिकार दिला असता तरी आमचा उमेदवार निवडून आला असता. यामध्ये ज्या अपक्षांनी आम्हाला मतं दिली त्यांचे आभार. जे स्वत:ला महाराष्ट्र समजतात, त्यांना या विजयाने लक्षात आलं असेल की ही जनता म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई आहेत. ही विजयाची मालिका सुरू झाली आहे ती आता कायम सुरू राहिल, असा टोला लगावला.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास 9 मतं फुटल्याची चर्चा आहे. यात धनंजय महाडिक यांचा विजय झाला. महाविकास आघाडीनं शक्तीप्रदर्शन केलं, चार उमेदवार जिंकणार असे दावे केले. पण देवेंद्र फडणवीसांनी पडद्याआड राहुन निवडणुकीचं प्लॅनिंग केलं. मतदानाच्या काही तास आधी आमदारांना विश्वासही दिला आणि तोच विश्वास निकालानंतर खरा ठरला.

 

Tags: #Shocking #RajyaSabha #election #results #DhananjayMahadik #SanjayPawar #wokeup #Maharashtra#धक्का #पहाट #संपूर्ण #महाराष्ट्र #झोप #राज्यसभा #संजयपवार #धनंजयमहाडीकनिवडणूक #निकाल #
Previous Post

महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार, महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर चाकूने हल्ला

Next Post

Rajyasabha ShivSena court राज्यसभा निवडणूक निकाल : सुहास कांदे यांचे मत रद्द, शिवसेना कोर्टात जाणार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Rajyasabha ShivSena court राज्यसभा निवडणूक निकाल : सुहास कांदे यांचे मत रद्द, शिवसेना कोर्टात जाणार

Rajyasabha ShivSena court राज्यसभा निवडणूक निकाल : सुहास कांदे यांचे मत रद्द, शिवसेना कोर्टात जाणार

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697