सोलापूर/बळीराम सर्वगोड
चालू शैक्षणिक वर्षांपासून शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून मराठी माध्यमासाठी ’एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. Solapur will reduce the burden of students’ backpacks from this year, 20% increase in school material rates; The school bell will ring from tomorrow
पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाताना दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी सात विविध विषयांची पुस्तके एकाच वेळी शाळेत नेण्याऐवजी या संपूर्ण अभ्यासक्रमाची तीन भागात विभागणी करून एकच पुस्तक न्यावे लागणार आहे. तसेच हे पुस्तक तयार करताना गणित आणि विज्ञान या विषयांत ठिकठिकाणी मराठीबरोबरच इंग्रजीतील संकल्पनांचाही वापर केल्याने विद्यार्थ्यांना आता द्विभाषिक पाठ्यपुस्तक या शैक्षणिक वर्षांपासून उपलब्ध होत आहे. या साठी महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक विभागाने ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ तयार केली असून, तिची अंमलबजावणी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे.
गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे सतत वाढत असून हे ओझे कमी करण्यासाठी अनेक स्तरांतून मतमतांतरे मांडण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देखील दप्तरांचे ओझे हलके करण्यासाठी सूचना केल्यावर शासन स्तरावरून कार्यवाही सुरु झाली. त्यानुसार राज्यातील मराठी माध्यमाच्या अभ्यासक्रमाची नव्याने मांडणी करत राज्य पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणार्या विद्यार्थ्यांमध्ये पाठदुखी, स्नायू आखडणे, मणके झिजणे, मान दुखणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, डोकेदुखी, मानसिक ताण असे अनेक आजार-विकार निर्माण होत आहेत. बालवयात जडणार्या या आजारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. ओझ्याविना शिक्षण या संकल्पनेच्या माध्यमातून शासनाने काही ठोस पावले उचलली आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/559701835707550/
□ शालेय साहित्य दरात २० टक्क्यांनी वाढ; उद्यापासून शाळेची घंटा वाजणार
सोलापूर : इंधन, कागद, शाई व स्टीलच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम शालेय साहित्यावर झाला आहे. वह्या, पुस्तकांसह इतर साहित्याच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाईन सुरू होत्या. निर्बंध शिथिल झाल्यानंतर यंदा पुन्हा पहिल्या दिवसांपासून शाळा ऑफलाइन सुरू होणार आहेत.
उद्या सोमवारी, १३ जूनपासून शाळेची घंटा वाजणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने शाळेचा परिसर गजबजणार आहे. सध्या पालकांची शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरू आहे.
नोटबुक, कंपासपेटी, स्कूल बॅग, पेन, वह्या, पाटी या साहित्यांना मागणी आहे. ग्रामीण भागातील शालेय साहित्य दुकानातही पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाउन पूर्वीच्या दरात आणि आताच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र, मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून गोरगरीब पालकही शैक्षणिक
साहित्य खरेदी करतानाचे चित्र आहे. दोन वर्षांत लॉकडाउनमुळे शालेय साहित्याची दुकाने प्रदीर्घ काळ बंद होती. त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आता पुन्हा देश आणि राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालकांसह व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. सध्या १०० पानी वह्या १० ते २०, २०० पानी ३५ ते ४०, लॉगबुक वह्या ४० ते ८५ रुपये दराने विक्री होत आहेत. तसेच पेन ५ ते ५० रुपये, रिफिल ३ ते २०, कंपास ६० ते ३५० , वर्तुळ ६० ते ८०, स्कूल बॅग १०० ते १००० रूपये दराने विक्री होत आहे. यामध्ये सरासरी २० टक्के दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/559126845765049/