सोलापूर : कुर्डू पंढरपूर रोडवरील डंपर व बस च्या अपघातामध्ये सुमारे 15 जण जखमी झाल्याची घटना आज रविवारी (ता. 12 जून ) सकाळी अकरा सुमारास घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.बस चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. Woman killed in ST accident of Miraj Depot in Solapur
कुर्डुवाडी कडे जाणाऱ्या बसला आचानक डंपर रोडवर आल्याने बस डाव्या बाजूला असणाऱ्या मातीच्या मोठ्या ढीगाऱ्यामुळे सुमारे पंधरा फुट खड्यात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. या बसमधील 76 प्रवशांचा जीव बालंबाल बचावला.
बस मधील 76 प्रवाशांचे प्राण बालंबाल बचावले. मिरज डेपोची MH 06 S 8371 या क्रमांकाची मिरज – माजलगाव ही बस कुर्डुवाडी कडे जात असताना कुर्डूहद्दीतील आदिशक्ती मंगल कार्यालयाजवळ आली असता शेजारीच क्रॉक्रीट मिक्स प्लांट मधून MH 45T 1055 या क्रमांकाचा डंपर मेन रोडवर अचानक आलेल्याने बसची डंपरला पाठीमागून जोराची धडक बसली. हा अपघात झाल्याची माहिती बसची माहिती बसचे वाहक व प्रवाशांची दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/559877495689984/
□ मुलीला माहेरी घेवून निघालेल्या महिलेचा यावलीजवळ अपघात, आई मयत तर मुलगी गंभीर जखमी
मोहोळ : सोलापूर – पुणे महामार्गावर यावली जवळ स्कुटीला पाठीमागून ट्रेलरने जोराची धडक दिल्याने एक महिला ठार झाली तर एक जण जखमी झाल्याची घटना पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मयत महिलेचे नाव सविता पोपट चव्हाण असून त्यांचे माहेर अरणकडे निघाल्या होत्या.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविता पोपट चव्हाण (वय ३७) व हर्षदा पोपट चव्हाण (वय १८) या दोघी आपल्या स्कूटी क्रमांक एम एच १३ डीजी ०४३९ यावरून सोलापूर मोहोळमार्गे अरणकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर यावली गावाजवळील वाकडे वस्ती जवळ ट्रेलर (क्रमांक एम एच ४६ बी यू ६०९६) हा पुण्याच्या दिशेने निघाला होता. त्याने त्यांच्या स्कूटीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात सविता पोपट चव्हाण (रा. सोलापूर) त्यांच्या अंगावरून गेल्याने होऊन त्या जागीच मयत झाल्या तर त्यांची मुलगी हर्षदा पोपट चव्हाण (वय १८ रा सोलापूर ) ही गंभीर जखमी झाली आहे. याबाबत चालक दत्तात्रय भगवान वैद्य (रा. भालगाव, ता. बार्शी) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता.11) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
मोहोळ – भरधाव जाणाऱ्या ट्रेलरट्रक ने स्कुटी मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार तर एक मुलगी जखमी झाली. सविता पोपट चव्हाण ( वय ३०, रा सोलापूर) असे मयत महिलेचे नाव आहे . तर हर्षदा पोपट चव्हाण ( वय १८ ) रा सोलापूर ही जखमी झाली . ही घटना शनिवारी सायंकाळी ६:३० वाजता सोलापूर पुणे महामार्गावरील यावली हद्दीतील वाकडे वस्ती जवळ घडली . या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे .
https://www.facebook.com/109399567404448/posts/559829232361477/